आरक्षण हक्क कृती समितीद्वारा मंत्रालयाजवळ तीव्र निदर्शने

आज आरक्षण हक्क कृती समितीद्वारा पदोन्नतीमाधिल आरक्षणाबाबत मंत्रालयात  पोलीसांचा कडक बांदोबस्त असतांना मंत्रालयाजवळील डाँ.बाबासाहेब आंबेडखर पुतळ्यासमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. निदर्शनाचे वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुणा गाडे आयबीसेफचे सुनिल निरभवने ,एस.के.भंडारे,आत्माराम पाखरे ,सिध्दार्थ कांबळे व शेकडो अधिकारी कर्मचारी ऊपस्थित होते. .हरिभाऊ राठोडा ,अरुणा गाडे, सुनिल निरभवने  आत्माराम पाखरे यांना अटक करुन कुलाबा पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

आरक्षण बचावासाठी  आरक्षण हक्क कृती समिती आक्रमक - मुख्यमंत्री व शरद पवार  यांना भेटून जर योग्य निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रातील सर्व  आमदारांना घेराव घालणार, मंत्रालयासमोर मानवी साखळी करणार


मुंबई- मागासवर्गीयांना (SC,ST,DT,NT,SBC)  कायदेशीर  मिळत होत ते  बेकायदेशीर रित्या अनुचित  पध्दतीने GR  काढून  पदोन्नतील 33%आरक्षण  दिनांक  7 मे  रोजी रद्द केले, राज्यातील सर्व मागासवर्गीयांनी मिळून स्थापन केलेल्या आरक्षण हक्क कृती समितीने दि. 20 मे रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर आक्रोश आंदोलन पुकारलेच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने दि. 19 मे  रोजी  त्यानंतर  दि.25 मे रोजी  अजित पवार यांनी बैठका घेतल्या परंतु त्यांनी मागासवर्गीयांचे आरक्षणाबाबत काहीही ठोस निर्णय घेतलाच नाही. 

भारतीय संविधान,मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, आरक्षण कायदा याचा अवमान केला असल्याने, मागासवर्गीयांच्या विरोधी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण समितीचे अमागासवर्गीय, आरक्षण विरोधी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदावरून का हटवित  नाहीत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागासवर्गीयांच्या आरक्षण मुद्द्यावर गप्प  का आहेत,  मुख्यमंत्री हे सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री आहेत, त्यांची  अजित पवार यांना मूक संमतीच आहे काय?  इत्यादी प्रश्न  आरक्षण हक्क कृती समितीने निर्माण केले आहेत.  

आरक्षण हक्क कृती समितीने  मुख्यमंत्री,उद्धव ठाकरे ,  शरद पवार यांना भेटीची वेळ मागीतली तरी ती अद्याप दिलेली नाही. दि. 1 जून रोजी मंत्रालयात पुन्हा अजित पवार यांनीच काही मंत्री यांचीच  बैठक घेतली , समितीच्या  सर्व सदस्याची बैठक झाली नाही व बैठकीत 7 में जी आर रद्द केला नाही किंवा 33% मागासवर्गीय पदावरील खुल्या वर्गाच्या  पदोन्नतीचे आदेश थांबविले/ स्थगित केले नाहीत, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची बाब पुढे केली आहे पुन्हा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबतचा निर्णय लांबवला आहे मात्र  उलट   मागासवर्गीयांच्या 33% आरक्षित  पदावरसुध्दा यांना हव्या असलेल्या पदोन्नत्याचे आदेश काढायचा सपाटाच लावला आहे. यात मागासवर्गीयांच्या बाजूने काय सकारात्मक आहे? 

यामुळे आता अजित पवार हटाव- आरक्षण बचाव असे आंदोलन करावे.मंत्रालयासमोर मानवी साखळी करून आक्रोश करणे,तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत पक्ष, आमदार, खासदार, मंत्री कोणीही बोलत नाहीत याबाबत तीव्र निषेध करून त्यांच्या विरुद्ध  दि. 7 जून ते 15 जून या कालावधीत राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटना व समाज  संघटनाच्यावतीने घेराव आंदोलन करणे,

 मा. उच्च न्यायालयाने दि. 20 मे रोजी दिलेले आदेश कोणतीही न्यायालयीन डिसिप्लिन चे पालन केले नाही व यामध्ये अजित पवार  आणि इतर कोणाचा हस्तक्षेप आहे काय याबाबत चौकशी करण्याची तक्रार विविध संघटनांनी सर्वोच्य न्यायालय व उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांना केलेली असुन  योग्यती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असुन आरक्षण हक्क कृती समितीच्या बैठकीत  ठरविण्यात आले असल्याची माहीती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA