गेली अनेक वर्षे महापालिका, समाजविकास विभाग व महिला बालकल्याण समितीच्या वतीने मागील वर्षी कन्यादान योजना, राजकन्या योजना, नवसंजीवनी योजना, जिजामाता/ जिजाऊ महिला आधार योजना, 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या विधवा / घटस्फोटित महिलांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे आदी योजना राबविण्यात आल्या, यासाठी अर्ज देखील मागविण्यात आले होते. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता या योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आल्या नव्हत्या. कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंबाची परिस्थिती हलाखीची झाली आहे, 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या विधवा / घटस्फोटित महिलांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान योजना, ठामपा क्षेत्रातील आर्थिकदुर्बल घटकातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य करणे, जिजामाता/ जिजाऊ महिला आधार योजनेतंर्गत अनुदान देणे, राजकन्या योजना, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजना, बचतगटांना अनुदान देणे या योजनांसाठी एकूण तरतुदीपेक्षा जास्त अर्ज पात्र झाल्याने या योजना कार्यान्वित करणेबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
यावेळी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, महिला व बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधव, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, क्रीडा समिती सभापती प्रियांका पाटील, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, उपमहापौर पल्लवी कदम, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा आशा डोंगरे, नगरसेविका विमल भोईर, नंदिनी विचारे, अनिता गौरी, मिनल संख्ये, कांचन चिंदरकर, संध्या मोरे, शिल्पा वाघ, सुखदा मोरे, पद्मा भगत, दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, दिपाली भगत, मालती पाटील, रागिनी बैरीशैट्टी,जयश्री डेव्हिड, नम्रता पमनानी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या