Top Post Ad

आरक्षण हक्क कृती समितीचे २६ जुनचा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन

 कल्याण - ठाणे जिल्हा आरक्षण हक्क कृती समितीची सहविचार नियोजन सभा नुकतीच १९ जून २०२१ बौध्द  समाज सांस्कृतिक मंडळाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय, बिर्ला कॉलेज रोड, पोलीस वसाहत जवळ कल्याण वेस्ट येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. कृष्णा कांबळे,  सहसचिव, वित्त विभाग महाराष्ट्र शासन (सेवा निवृत्त) हे होते. प्रस्तुत सभेला  आरक्षण हक्क कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. हरिभाऊ राठोड (माजी खासदार) आरक्षण हक्क कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. सुनिल निरभवने, मा. शरद कांबळे, मा. संजय कांबळे बापेरकर, मा. यशवंतजी मलये (अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन), मा. तुकाराम मारगाये (विभागीय  अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन), मा संजय थोरात, डॉ. कृष्णा पराड (मुंबई विद्यापीठ), प्रा. भास्कर (हिंदुजा कॉलेज), प्रमोद बच्छाव (आयुक्त, कस्टम विभाग), मा.मंगेश मोगड ( असिस्टंट आयुक्त), संतोष तोड्से, डॉ. विनोद कुमरे, घनश्याम शिंपी( महानगर पालिका), राजकुमार सुर्वे (शिधा विभाग), राकेश जाधव, एस.ती मोरे आदि मान्यवरांसह राज्य आरक्षण हक्क कृती समितीशी संलग्नित व जिल्ह्यातील इतर सर्व मागासवर्गीय तसेच कॅडर संघटनांच्या अधिकारी, कर्मचारी प्रचंड मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते

मुख्य संयोजक डॉ महेन्द्र दहिवले यांनी शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांचा व न्यायालयीन निवाडयांचा हवाला देत त्यांनी आरक्षण हक्क कृती समितीची भूमिका विशद केली व मागासवर्गीय समाजाला आता लढा दिल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. जर आपण यावेळेस एकत्रित येऊन लढा देऊ शकलो नाही तर येणारा काळ आपल्यासाठी फार भयंकर असणार आहे. शासनाचा हा निर्णय जर आपण परतवून लावला नाही तर इतिहासातील मनुस्मृतीच्या प्रमाणे दिवस यायला फार काळ राहिलेला नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले 

आरक्षण हक्क कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. हरिभाऊ राठोड साहेब(माजी खासदार) म्हणाले की शासनाने ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाने मागासवर्गीय समाजांमध्ये फोडा आणि झोडा या नीतीने अन्याय करणे सुरू केली आहे. याकरिता एसी, एसटी, डीटी,एनटी, एसबीसी व ओबीसी यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सहभागाने ठरवून दिनांक 26 जून ला होणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आयोजन आवाहन केले आणि या  लढ्याला आर्थिक सहकार्य करण्याचे आव्हाहन केले.    

कृती समितीचे राज्य निमंत्रक मा. सुनिल निरभवने यांनी मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. समाजामध्ये चेतना निर्माण करणे आवश्यक आहे. राज्य स्तरापासून आरक्षण हक्क कृती समिती राबवित असलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा दिला व आपल्याला जिल्हा स्तरावर काय काय करावे लागेल याचा सविस्तर कृती आराखडा सागितला आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. निधी गोळा करणे, जबाबदार्‍या वाटून घेणे, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

 कृती समितीचे राज्य निमंत्रक मा. शरद कांबळे यांनी बँकिंग मध्ये होणार्‍या अन्याय अत्याचाराचा आलेख विषद केला. कृती समितीचे मुख्य राज्य निमंत्रक मा. संजय कांबळे बापेरकर मागासवर्गीय सर्व कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना,युवक संघटना, विद्यापीठीय विद्यार्थी व लोक प्रतिनिधी या सर्वांनी मिळून एकत्र लढा देण्याची आवश्यकता आहे त्यांनी प्रतिपादन केली. सहविचार सभेचे अध्यक्ष कांबळे  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनाची भूमिका आणि राजकारण्याचा दबाव यामुळे समाजपयोगी निर्णय निर्गमित करणे अवघड जाते. या नियोजन सभेच्या वतीने  विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी समोर 26 जून २०२१ ला आयोजित केलेला आक्रोश मोर्चा  यशस्वी करण्याचे  राहुल भालेराव यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com