झलकारी नावाच्या दासीला सावरकर मात्र इतिहासातून वगळतात

 जातीचा चष्मा डोळ्यांवर ठेवूनच सावरकरांनी इतिहास लिहिलाय. त्यामुळं त्यांना अनेक ठिकाणी सत्त्याचं कोंबडं झाकून ठेवावं लागलं !  परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. त्यांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकात ते राणी लक्ष्मीबाईसोबत असणाऱ्या आणि इंग्रजांशी लढणाऱ्या एका दासीला उल्लेख करतात. मात्र तिचं नाव द्यायचं ते कटाक्षानं टाळतात. इतिहासतज्ज्ञ द ब पारसनीस मात्र किल्ला सोडताना राजासोबत असलेल्या दोन दासींचा उल्लेख करतात... काशी आणी मुदर अशी त्यांची नावेही नमूद करतात !

तथापी, बाजी प्रभू देशपांडेप्रमाणे छातीच्या कोट करून दुष्मनाला रोखून, राणीला सुखरूप पॅसेज करून देणाऱ्या झलकारी नावाच्या दासीला सावरकर मात्र इतिहासातून वगळतात !  कारण, झलकारी ना सावरकरांच्या जातीची, ना पातीची !.... ती बिचारी उपेक्षित वर्गातील ! मग, भटा बामनांनी लिहिलेल्या इतिहासात उपेक्षित वर्गाच्या झलकारीची वर्णी कशी लागणार ?

सावरकर  लढाईतून निघून ( पळून ?) गेलेल्या #मनूचा ( लक्ष्मीबाईचे लहानपणीचे नाव ) इतिहास लिहित असताना त्यांच्या डोक्यात वेगळाच #मनू घर करून होता ! **

आज बुंदेलखंडात लक्ष्मीबाईचं नाव १०-२० ब्राह्मण घरातून तेवढं घेतलं जातं, मात्र, बुंदेलखंडातील लेखक, कवी, लोककलाकार थोरवी गातात ती केवळ झलकारीची ! कथा- कादंबऱ्या, लोककाव्य... यातून झलकारीच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायिले जाताहेत.


अशाच एका लोककाव्यातून झलकारीचं वर्णन करताना लेखक म्हणतोय....
* अंग्रेजों की गोली खाई, वह झलकारी थी ।
* अंग्रेजों को पीठ दिखाई, वह लक्ष्मीबाई थी ।
* झांशी किल्ला बचानेवाली, वह झलकारी बाई थी ।
* झांशी किल्ला संकटमे छोड़ा, वह लक्ष्मीबाई थी ।
* प्राणों की बाजी लगा चुकी, वह झलकारी बाई थी ।
* प्राण बचाकर भागी, वह राणी लक्ष्मीबाई थी ।

आणखी एका काव्यात लोककवी त्याची वेदना व्यक्त करताना म्हणतो...

* बुन्देलो, हरबोलो ने घड दई थी, झूठ कहानी को...
* झलकारी रण मे झूजी, पर गाया लक्ष्मी राणी को ।
* रणचंडी बन कर जो, अंग्रेजो पर किलकारी थी...
* गोलियों से छलनी हुई, वह लक्ष्मी नही झलकारी थी ।
**

लक्ष्मीबाईला पराभवाची चाहूल लागली. तेव्हा तिनं किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्या किल्ल्यातच आहेत, असं इंग्रजांना वाटावं, म्हणून झलकारीनं राणीचा पोषाख अंगावर चढवला.... त्यानंतरच राणीनं किल्ला सोडला !  आणि इकडे झलकारी इंग्रजांसमोर झुंजीसाठी उभी ठाकली !

४ एप्रिल ते ५ एप्रिल (१८५८ ) ... संपूर्ण दिवसभर झलकारीनं इंग्रजांना रोखून धरलं. त्याचा फायदा घेत लक्ष्मीबाई झांशीपासून दूर जाऊ शकली ! आणी इकडे ५ तारखेला रात्रभर इंग्रजांशी लढून दमलेली झलकारी आणी तिचा नवरा पूरन...( नो गंगाधररावाच्या सैन्यात शिपाई होता !)  दोघेही स्वातंत्र्याचं मोल चुकवताना शहिद झाले !

झलकारीचा जन्म २२ नोव्हेंबर १८१० रोजी झाला.  झांशी जवळील भोजला हे तिचं गाव. आई यमुनादेवी आणि वडील श्रीसिद्ध ! ते विणकाम करीत. कबीरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 

कालांतरानं झलकारीच्या पराक्रमाची कथा सर्वत्र पसरली. तिच्या स्वातंत्र्यप्रेम आणि बलिदानाचं स्मारक असावं, या हेतूनं लोकांनी रायबरेली येथे तिचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा केला. तसाच आणखी एक पुतळा राजस्थानातील अजमेर येथेही बसवलाय. केंद्र सरकारनं तिच्या पराक्रमाचं महत्व लक्षात घेत २००१ साली तिच्या स्मरणार्थ पोस्ट तिकीट प्रकाशित केलंय !

रायबरेली येथील पुतळ्याच्या चबुतर्‍यावर प्रख्यात राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्तांनी रचलेल्या काव्यओळी अशा आहेत :* जाकर रण मे ललकारी थी, वह झांसी की झलकारी थी
* गोरो को लढना सिखा गयी, रानी बन जौहर दिखा गयी
* है इतिहास मे जो झलक रही, वह भारत की सन्नारी थी
* झलकारीबाई, तुम झलको, हर नारी की आभा मे
* जागरण - ज्योतीसी दमक उठो, भारतकी इस प्रत्याभा मे
* ऐसे पथपर चलनेवाली ललनाओं को कैसा विराम
* निज मातृभूमीकी रखकारिणी , झलकारी को शत प्रणाम

झलकारीच्या अशा त्याग, स्वातंत्र्यप्रेम, बलिदान आणी पराकुमाची नोंद सावरकरांना घ्यावी वाटली नाही. मात्र, लढाईच्या धामधुमीतही लक्ष्मीबाईच्या पाठी धनाची पेटी घेऊन पळवाऱ्या कर्तृत्वशून्य मोरोपंत तांबेचा उल्लेख करायला सावरकर विसरत नाहीत ! हिंदू हिंदू म्हणून सकल बहुजन गोळा करण्याच्या, मात्र त्यांच्या डोक्यावर भटी वर्चस्व लादण्याच्या वृत्तीपासून सावरकरही दूर राहू शकले नाहीत, हे या निमित्ताने दिसले.

( अकथित सावरकर / १८५७ चे स्वातंत्र्यसमर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA