Top Post Ad

हे तर मला बदनाम करण्याचे विरोधकांचे कारस्थान - आमदार सरनाईक

  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर छापे टाकल्यानंतर प्रताप सरनाईक यांचं सार्वजनिक दर्शन झालेलं नाही. दोन दिवसापूर्वी त्यांच्या मतदारसंघात आमदार गायब झाल्याबद्दल लागलेले फलकही चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शोधून द्या शोधून द्या आमदारांना शोधून द्या अशा घोषणा देत फलक फडकवले. तसंच किरीट सोमय्या यांनी आमदार प्रताप सरनाईक कुठे आहेत हे शोधून द्यावे याविषयी पोलीसांकडे तक्रारही नोंदवल्याचं यावेळी सांगितलं.

 भाजपने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असून त्यांना शोधून काढा अशी तक्रार केली आहे. ही तक्रार भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी केली असून यावेळी आंदोलनदेखील करण्यात आले.  किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रताप सरनाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केले. मतदारसंघात कोविड काळात हजारो लोक कोरोनाबाधित झाले असून याकाळात आमदारांचा थांगपत्ताच नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी का, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचे काम करत आहेत, याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

 तसेच गेल्या तीन महिन्यांपासून दिसले नसल्यानं आमदार हरवले असल्याचे फलक त्यांच्या मतदार संघात दिसत असल्यानं खळबळ उडाली आहे. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधीत्व करतात. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईनंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं सार्वजनिक दर्शन दुर्लभ झालं आहे. ऐन कोरोनाच्या काळातही प्रताप सरनाईक यांचं दर्शन झालं नसल्याचे हे फलक आहेत. काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिका-यांनी आमदार हरवल्याची तक्रारही पोलीसांकडे नोंदवली होती. ओवळा-माजिवडा वा-यावर आमदार कागदावर, तीन महिने झाले हो , आमचा आमदार होता तो- कुठे गेला सध्या तो , झाला गायब हो तो, ओवळा-माजिवड्याचे आमदार हरवले-आपण त्यांना पाहिलंत का असे फलक लावण्यात आले असून या फलकांवर सामान्य मतदार असं लिहिण्यात आलं आहे. हे फलक कोणी लावले याची चर्चा सध्या सुरू आहे.  

मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढत केंद्रातील आणि राज्यातील सरकारमध्ये असलेला वाद काही लोकप्रतिनिधींना मारक ठरत असून मी त्याचाच बळी ठरलो असल्याची खंत व्यक्त केली. विरोधी पक्षातील मंडळींना काहीतरी निमित्त हवंच असतं म्हणून त्यांनी हा प्रकार करण्यास सुरुवात केली आहे. मी ओवळा माजिवडा या मतदारसंघातून मागील पाच वेळा निवडून आलो आहे. आणि यावेळेस तर प्रचंड मताधिक्याने निवडून आलो आहे. त्यामुळे माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हा माझ्या विरोधकांचा डाव असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. 

व्हीडीओ द्वारे प्रताप सरनाईक यांनी आपले मत व्यक्त केले. 👇
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com