अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन

 कल्याण:   लग्नाचे आमिष दाखवून मंगेशी सिटी कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या इसमाने फसवणूकीने शारीरिक संबंध करून अल्पवयीन मुलीला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत केलेल्या लेखी तक्रारीकडे पोलिसांनी देखील दुर्लक्ष करून तीची तक्रार दबाव टाकून निकालात काढली आहे. असल्याचा आरोप करीत  पीडिताने मानवी अन्याय निर्मूलन संघटनेकडे धाव घेतली आहे. संस्थेच्या वतीने सदर पिडीतेला न्याय मिळवून देऊ तसेच ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करू. पीडितेला न्याय मिळाला नाही तर याबाबत आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुवर्णा  कानवडे यांनी दिला आहे.  

 मुलगी किती महिन्याची गरोदर आहे याचा तपास करण्यासाठी सदर मुलीने दिनांक 12 मे 2021 रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात तपास करण्यासाठी गेले असता सदर शास्त्रीनगर रुग्णालयात  UPT positive असल्याने सोनोग्राफी करण्याचे सागितले तेव्हा कल्याण  पश्चिम येथील असलेले  डायग्नोस्टिक सेंटर येथून मुलीने डॉक्टर यांच्यासमक्ष सोनोग्राफी करून घेतले असता सदर मुलगी दहा आठवडे 6 दिवसाची गरोदर आहे असे रिपोर्ट देण्यात आले आहे सदर CRL 38.6mms ( FHR-169bpm) रिपोर्ट आले आहे. त्यामुळे मुलीने आपल्या सोबत झालेल्या फसवणुकी बाबात 5 मे 2021 रोजी  महात्मा फुले पोलीस स्टेशन येते धाव घेतली असता तत्काळ गुन्हा नोंद न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नावे अर्ज करण्याची माहिती दिली होती. 

गुन्ह्याचे गांभीर्य न घेता मुलीला चुकीची माहिती देवून अर्ज करण्यास भाग पाडले.  महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 5 मे 21 रोजी  विशाल पाटील याने मुलीला महाराष्ट्र गेस्ट हाऊस येते घेवून जावून शारीरिक संबंध ठेवले होते. ह्याचे ही गांभीर्य पोलिसांनी घेतले नाही. अर्ज केल्यावर एक आठवड्यानंतर महात्मा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी मुलीची तक्रार हद्दीवरून खडकपाडा पोलीस ठाणे येथे वर्ग केली. खडकपाडा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक यांनी मुलीला लग्नाचे दबाव टाकून तो तुझ्यासोबत लग्न करणार आहे. मग तक्रार का करतेस अस दबाव टाकून तिचा अर्ज निकाली काढला. सदर अर्ज निकाली काढल्यानंतर त्याने पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. 

याबाबत गुन्हा नोंद करण्यासाठी खडक पाडा पोलीस स्टेशन येते धाव घेतली असता सदर खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पिडीत मुलीला अपमानास्पद वागणूक देऊन पोलीस स्टेशन मध्ये तिचा पाणउतारा करून हाकलून दिले असल्याची माहिती पिडीतेने दिली. यानंतर सदर पिडीताने खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या भेटीकरिता विनंती केली असता सदर पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी सांगितले की  वरिष्ठांच्या आदेशानुसार तुझा कोणताही गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. वरिष्ठांनी सांगितले आहे की तुला काय करायचे ते तू कर पण खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये तुझी तक्रार दाखल करता येणार नाही. त्यामुळे वरिष्ठ तुला भेटू शकत नाही. अशा तऱ्हेच्या संपूर्ण घटनेची माहिती पिडीताने दिली आहे.

40 दिवसाहून अधिक कालावधी उलटून सुद्धा सहायक पोलीस आयुक्त याना दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यासाठी पीडित मुलीने मानवी अन्याय निर्मूलन संघटना जिल्हा अध्यक्षा सुवर्णा ताई कानवडे याच्या कडे  धाव घेतली आहे. गुन्हेगारासह त्याला सहकार्य करणाऱ्यां सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी.  तसेच सतत पोलीस स्टेशन येते धाव घेणाऱ्या पिडीत मुलीची तक्रारीची शहानिशा न करता दबाव टाकून तिचा अर्ज निकालात काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णाताई कानवडे व ठाणे जिल्हा सचिव शैनाज खत्री यांनी अप्पर पोलीस आयुक्त कल्याण यांना पत्राद्वारे दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA