खारटन रोड शौचालयाच्या साफसफाईकरिता राष्ट्रवादीतर्फे सह्यांची मोहीम

   ठाण्यातील  खारटनरोड येथील शौचालयाची फार दुरावस्था झालेली आहे .त्याची साफसफाई मागील कित्येक महिन्या पासून झालेली नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देऊनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याच परिसराच्या अगदी जवळच ठाण्याच्या उपमहापौरांचे निवास आहे. मात्र तरीही येथील नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

या शौचालयाच्या साफसफाईचे काम  लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी दिनांक १४ जुन रोजी स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी पक्षा्च्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला येथील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे विजय भम्ब्रे  (१४८ विधानसभा अध्यक्ष ),  वार्ड अध्यक्ष २२ संदीप ओ. ढ़कोलिया,  वार्ड अध्यक्ष  २२ सुमीत गुपता , संजीव दत्ता  (चिटणीस ठाणे शहर जिला ) ,  नल्लनी सोनवणे (महिला कार्य अध्यक्ष, ) अखिल भारतीय वाल्मीकि  नवयुवक संघचे (ठाणे शहर उपाध्यक्ष )दिनेश मेहेरोल यांच्यासह  राष्ट्रवादी  कांग्रेस पार्टी वार्ड क्र. २२ च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या