Top Post Ad

अनधिकृत बांधकामाकडे नौपाडा प्रभाग समितीचे दुर्लक्ष ?

 ठाणे - ठाणे महानगर पालिका हद्दीत अनधिकृत इमारतींची यादीत दरवर्षी वाढच होत आहे. दर वर्षी ठामपा आपल्या वेबसाइटवर आणि वर्तमानपत्रांमध्ये याबद्दल यादी प्रसिद्ध करते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. दरवेळेस ही यादी वाढतच आहे. या बांधकाम व्यवसायिकांसोबत या अधिकाऱयांचे अर्थपुर्ण लागेबांधे असल्यानेच ही बांधकामे सर्रासपणे सुरु आहेत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनचा फायदा घेत ठाण्यात प्रचंड गतीने अनधिकृतपणे बांधकाम सुरु आहे. 

 नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील तीन पेट्रोलपंप परिसरातील विजय अपार्टमेंट समोर सिद्धिविनायक होर्डिंग्जच्या मागे अनधिकृतपणे  लोडबेरिंग करून  अजित शॉपिंग सेंटरचे मजले वाढवण्याचे काम सुरु आहे.  लोडबेअरिंग करून दिवसरात्र सदरचे काम शहराच्या मध्य रस्त्यावर चालू आहे. ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱयांना बाहेरून पडदा लावून हे काम बंद असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र  हे काम आतून प्रचंड जोरात सुरु असून भर पावसात देखील हे काम सुरु असून यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांना काहीही माहिती नाही. ते म्हणतात काम बंद आहे. 


 नौपाडा प्रभाग समिती परिसरातील  जवाहरबाग परिसरात दादोजी कोंडदेव स्टेडियम लगत बिनदिक्कतपणे ग्राऊंड प्लसचे बांधकाम जोरात सुरु आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची यादी  दिवसेंदिवस वाढतच आहे. इतकच नव्हे तर जिथे मोकळी जागा मिळेल तिथे भूमाफिया आपले बांधकाम सुरु करीत आहेत. ठाणे जवाहरबाग जवळील मच्छीमार्केट मागील बाजुला भोईर देशी बारच्या लगत लोखंडी (आय बिंम)च्या  साह्याने तळ मजला आधिक माळे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. नौपाडा प्रभाग समितील अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. दुमजली असलेले हे बांधकाम खाली गाळे आणि वरती रहाण्यासाठी बांधत असल्याचे दिसत आहे.
लोडबेअरींगवर उभे रहात असलेले हे बांधकाम करणारा गुप्ता म्हणतो, मैने सब  पालिका अधिकारीको सेट किया है. मेरे काम पर कोईभी कारवाई नही होगी. एवढी शाश्वती या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या परप्रांतिय भूमाफियांकडे आहे. याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीतील सहा. आयुक्‍तांसोबत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे.  हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. मागील काही  दिवसांपासून ठाण्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. अशा वेळी या गुप्ता नावाच्या परप्रांतियाने स्टेडियमलगत असलेली सर्व जागा आपल्या ताब्यात  घेऊन बिनदिक्कतपणे बांधकाम सुरु केले आहे. याला सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा पाठिंबा असल्याचे तो सांगत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com