ओबीसी सेलच्या माध्यमातून संघटनेला नवी उभारी देणार भानुदास माळी

 भिवंडी 
 ओबीसी काँग्रेस सेलच्या माध्यमातून पक्षांतर्गत एक फळी निर्माण करून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम करू असा विश्वास काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे. ते भिवंडी शहर जिल्हा व ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भिवंडीत आले होते.त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

भिवंडीत ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुढे बोलताना माळी यांनी सांगितले की ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवावी जेणेकरून ज्यांचे काम सुखरूप होते अशी जनता कधीच विसरत नाही.त्यामुळे ते आपसूकच पक्षाशी जोडले जातात.तर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष ऍड.रशीद ताहीर मोमीन यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी ओबीसी सेल असेल अथवा ज्येष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते असतील सर्वांनी एकोप्याने पक्षाचे काम मनोभावे केले पाहिजे.

याप्रसंगी ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष मा.आमदार रशीद ताहीर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष शुभांगी शेरेकर, ओबीसी प्रदेश सरचिटणीस रविंद्र परटोळे, दिगंबर राऊत, ओबीसी नेते नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव सोमनाथ मिरकुटे, भिवंडी शहर अध्यक्ष ओबीसी अनंता पाटील, ठाणे ग्रामीणचे दिनेश सासे, भास्कर जाधव, तुषार देसले, बाळा हुकमाली, शैलेश राऊत आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या