Trending

6/recent/ticker-posts

तौत्के चक्रीवादळ ; धारावीत ५० वर्षापुर्वीचे जुने झाड पडले

   तौत्के चक्रीवादळाचा परिणाम कालपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. मुंबई धारावीतील मुकुंदराव आंबेडकर नगर, संत रोहिदास मार्ग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक शेजारील मनिष मेडिकल समोरील ५० वर्षापुर्वीचे जुने झाड शौचालयावर पडले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही


. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतही अॅलर्ड जारी करण्यात आला आहे. कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळानं झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यात या वादळाचा परिणाम जाणवला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली तर झाडंही उन्मळून पडली आहेत. सोमवारी चक्रीवादळामुळं रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अॅलर्ट व तर, रायगडला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या