सीरम इन्स्टिट्यूट आता कोरोना लसीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत

 

 लंडन : भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लसीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे.  आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. 'द टाईम्स' ' ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक  अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, हे कोल भारतातील सर्वात शक्तित्राली व्यक्तींकडून येतात. धमक्या हा 'एक अतिरेकीपणा आहे' पुढे पुनावाला यांमी म्हटलंय की, यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. 

 लसीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेळे आहेत. मात्र, 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे ज्रीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे (अदर पुनावाला यांनी z सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. सीआरपीएफ द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे. सध्या जगभरात प्राधान्याचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कोरोनाविरोधातील लढ्याचा! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अदर पुनावाला हे या कंपनीचे ९६0 आहेत. सध्या महत्त्वाच्या जागी आणि प्रकाडठाझोतात असणाऱ्या अदर पुनावाला यांच्या जीविताला धोका संभवू ठाकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.

 दरम्यान या वर्षातील जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याने खळबळ उडाली होती. हडपसरजवळील गोपाळ पट्टीत असणाऱ्या सिरम प्लांटला ही आग लागली होती. यामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. 

 गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया 👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या