Top Post Ad

कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याची मागणी


 जिल्ह्यातील उल्हासनगर आणि ठाणे कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये रूपांतरित कराव अशी मागणी टिसानं केली आहे. कामगार आणि उदयोजक कोट्यवधी रुपये ESIC ला वर्गणी भरतात.  परंतु जिल्ह्यात कामगारांसाठी कोणतेही कोव्हिडं हॉस्पिटल नाही त्यामुळे उल्हासनगर आणि ठाणे येथील कामगार हॉस्पिटलचे तातडीने कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास ESIC ला तातडीने सांगावे जेणे करून तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता येईल असे आवाहन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजे टिसाच्या वतीने केंद्रीय कामगार मंत्री आणि संसदीय कामगार  समिती सदस्य तसेच स्थानिक खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे ह्यांना ट्विटर द्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान मागील वर्षी कोरोना फेलावत असताना जुन महिन्यात विद्यमान ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी देखील याबाबत मागणी केली होती.  कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून नवीन रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र वागळे इस्टेट भागात कामगार हॉस्पीटल हे कोवीड रुग्णालय म्हणून का वापर केला जात नाही, असा सवाल कॉंग्रेसचे ठाणे  शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी उपस्थित केला होता. मात्र या मागणीला तत्कालिन प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती.  कामगार रुग्णालय हे अद्ययावत असल्याने त्याचा वापर तत्काळ करावा. या मागणीचा विचार केला गेला नाही तर कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही शिंदे यांनी दिला होता. 

 वागळे इस्टेट भागात अद्ययावत असे कामगार रुग्णालय उभे आहे. चार मजली इमारतीत 1 हजाराहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, कोरोनामुळे येथे इतर आजारांचे रुग्णही कमी संख्येत येत आहेत. येथे डॉक्टर आणि नर्सेस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासनाचा हा खर्च देखील वाचणार आहे. परंतु असे असतांनाही या रुग्णालयाकडे का दुर्लक्ष केले जात असल्याची बाब शिंदे यांनी निदर्शानास आणून दिली होती.  हेच रुग्णालय कोवीड रुग्णालय म्हणून वापरात आणता येऊ शकणार आहे. त्यामुळे याचा गांर्भीयाने विचार करुन हे रुग्णालय ताब्यात घ्यावे,  हे रुग्णालय कोवीडसाठी का ताब्यात घेतले जात नाही, याची स्पष्टता करावी,  या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशाराही मनोज शिंदे यांनी दिला होता. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com