रुबी घोन्सालवीस यांचा धम्मदिक्षा सोहळा संपन्न

मुंबई  "बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, मुंबई विभाग" या संस्थेच्या विद्यमाने  बौद्धधम्म दिक्षा समारंभ अंकुर बुद्धीविहार नायगाव येथे सरकारी नियमांचे पालन करून संपन्न झाला. वसई येथील रुबी फिलिक्स घोन्सालवीस यांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून बोद्धधम्माची दिक्षा घेतली. आदर्श बौद्धाचार्य संस्कारच्या विद्यमाने त्रिशरण पंचशिल व २२ प्रतिज्ञा देऊन रुबी घोन्सालवीस यांस धम्मदिक्षा देण्यात आली, त्यावेळेस उपस्थित मान्यवरांनी मंगलकामना व्यक्त करीत रुबी घोन्सालवीस यांना शुभेच्छा दिल्या, तसेच संघाच्या वतीने प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  शाखा क्रमांक ११ पाटपन्हावे शाखेचे सभासद दिवंगत शांताराम लक्ष्मण कदम यांचे चि. सुबोध कदम यांच्या सोबत रुबी घोन्सालवीस बौद्ध पद्धतीने विवाहबद्ध झाल्या. 

बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, मुंबई विभाग" या संस्थेचे अध्यक्ष. सिध्दार्ध पवार, आदर्श बौद्धाचार्य संस्कार अध्यक्ष मा. संदिप गमरे, सचिव मनोज पवार यांनी त्रिशरण पंचशिल व २२ प्रतिज्ञा देऊन रुबी घोन्सालवीस यांस धम्मदिक्षा दिली, संस्थेचे मा. विश्वस्त रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष दिपक मोहीते, उपाध्यक्ष सुरेश पवार, सरचिटणीस संजय तांबे, विभाग अध्यक्ष अजय जाधव, शाखा क्रमांक ११ पाट पन्हावेचे अध्यक्ष नितीन कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad