त्रंबकेश्वर येथील आधारतिर्थ अनाथ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूची भेट

डोंबिवली 
नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे कार्यरत असलेल्या आधारतीर्थ आश्रमात असलेल्या अनाथ मुलांसाठी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन, कल्याण या संस्थेच्या वतीने आश्रमाला जीवनोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. संस्थेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. सीमा वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य स्टेट कमिटी मेंबर सौ. चित्रा उर्फ श्रावणी कामत यांच्या नेतृत्वाखाली सुरेशजी गायकवाड , रत्नप्रभा गायकवाड व चालक मंगेश गमरे यांनी प्रत्यक्ष आश्रमाला भेट देऊन या वस्तू दिल्या.  

कोरोना काळ व लॉकडाऊन असल्याने असे आश्रम चालवतांना अनेक अडचणी येत असतात अशावेळी आपण स्वतः हून मदतीचा हात दिला पाहिजे तसेच आम्हाला अभिमान आहे .अशा सर्व पदाधिकारी व स्वंयसेवकांचा जे समाजासाठी सदैव तत्पर असतात  असे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे म्हणाले ,सी. आर. डब्लू. ए. च्या सदर संस्थेचे पदाधिकारी व स्वंयसेवक हे विविध जिल्ह्यांत कार्यरत आहेत.. असं राजेंद्र वखरे म्हणाले. 

स्वातंत्र्य सैनिक कै.व्यकंटेश विष्णू कामत यांच्या २२ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून संस्थेने वेगळा उपक्रम राबविला.व त्यांच्या कार्याला उजाळा दिला.ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष संजय वि.देशमुख सर यांचे या साठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.आता पुढील मिशन लसीकरण : संस्थेच्या वतीने नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री वखरे यांनी सांगितले. 

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन, कल्याण  या संस्थेचा जन्म झाला आहे.चला पेटवू या दिवे, ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे. हे ब्रिद वाक्य घेऊन संस्था कार्यरत आहे. सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे योग्य मार्गक्रमण सुरू आहे .आपल्याला कोणी मागेल तेव्हाच देण्यापेक्षा कुणाला कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ही संस्था विविध वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना भेटी देत असते. तर वीट भट्टीवरील कामगार महिला व पुरुषांना आवश्यक वस्तू व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करीत असते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या