
त्यानंतर सदरची बाब गुन्हे शाखा युनिट-५ च्या वरिष्ठ अधिकारी याना दिली. त्यानुसार युनिट-५ चे पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी पथकाने बनावट आरटी-पीसीआर चाचणीचा बनावट रिपोर्ट देताना आरोपी अफसर मंगवाना आणि संकपाल धवने याला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही कारणास्तव निगेटिव्ह आटी पीसीआर रिपोर्ट हवा असल्यास त्या व्यक्तीकडून अवघ्या १२०० रुपयांमध्ये कोणताही स्वॅब न घेता पालिकेच्या वाढिया रुग्णालयातून बनावट आरटी-पीसीआर रिपोर्ट देण्यात येत असत. यात रुग्णालयाचे अन्य अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागाचा संशय बळावला आहे. तर अशाप्रकारे आतापर्यंत किती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ते रुग्ण वावरून किती लोकांना संक्रमित केले असेल याबाबत विचार होणे गरजेचे आहे. गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस पथक या रॅकेटमध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे याबाबत चौकशी करीत आहेत.
हे दोघेही आरोपी ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने परिचर म्हणून काम करतात. अफसर हा वॉर्डबॉय असून संकपाल हा बाईक रुग्णवाहिकाचालक म्हणून काम करतो. स्राव गोळा करण्याचेही काम त्याच्याकडे होते. एखाद्याला काही कारणास्तव निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्टची गरज असल्यास त्यांच्याकडून ते एक ते दीड हजारांची रक्कम घेऊन कोणताही स्राव न घेताच केवळ आधारकार्डवर कोविड सेंटरवर स्राव न घेतलेली स्वॅबस्टिक तपासणीसाठी लॅबमध्ये जमा करीत असत. त्यावर कोणताही स्वॅँब नसल्यामुळे तपासणीमध्ये निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट लॅबमधून प्राप्त होत होता. हाच रिपोर्ट घेऊन मोफत होणाऱ्या चाचणीचे पैसे घेऊन शासकीय यंत्रणेचीही ते फसवणूक करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.
0 टिप्पण्या