Top Post Ad

केंद्र सरकारविरोधात मुंबई काँग्रेस तर्फे मुंबईतील ६ जिल्ह्यामंध्ये आंदोलन


 मुंबई व महाराष्ट्रामध्ये कोविड च्या लसीकरणाच्या बाबतीत अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे. १ मे २०२१ पासून राज्यात १८ ते ४४ वयोगातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. परंतु पुरेसा लसींचा पुरवठा केंद्र सरकारने केला नसल्याने हे लसीकरण स्थगित करावे लागले. असे असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाची सर्व जबाबदारी राज्यांवर थोपवून आपले हात झटकत आहेत. आज आपल्या देशातील १८ ते ४४ वयोगातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे आणि आमच्या देशातील १५० रुपयांची कोविडची लस जी आमच्या देशातील नागरिकांना मिळायला हवी होती, ती लस भाजप सरकारने इतर देशांना विकली व रशियातून आयात केलेली स्फुटनिक ची १५०० रुपयांची लस आपल्या देशातील नागरिकांना विकू पाहत आहेत. याबाबत कांग्रेस  केंद्र सरकारचा निषेध करत आहे. या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात मुंबईतील ६ जिल्ह्यांमध्ये 'मोदीजी हमारे बच्चो कि व्हॅक्सिन क्यो बेची?' आंदोलन सुरु करणार

फेब्रुवारी मध्ये कोविडची दुसरी लाट पसरायला सुरुवात झाली. जगातील सर्व देशांनी आपल्या नागरिकांचे मोफत लसीकरण केले. पण आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मात्र आपली लस, जी आपल्या देशातील नागरिकांना सर्वप्रथम मिळायला हवी होती, ती ९३ देशांना विकली आणि भाजपचे काही नेते त्यांच्या या वागण्याचे समर्थन करत आहेत. या विरोधात मुंबईतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये १० ते ११ या वेळेत मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते 'मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन क्यो बेची?' असे लिहिलेला फलक हातात घेऊन उभे राहणार आहेत व मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. येत्या २ दिवसांत हे आंदोलन सुरु होईल व ६ दिवस हे आंदोलन चालेल.  आंदोलनाची सुरुवात उत्तर मुंबई जिल्ह्यातून होईल, 

कोरोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या घातक आजाराचा प्रादुर्भाव आता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या आजाराचा उपचार ही महागडा असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. या आजारावरील लिपोसोमल अँफोटेरिसिन बी या इंजेक्शनची किंमत १५०० रुपये असून ते कमीत कमी २० वेळा घ्यावे लागते. तर फायझर कंपनीच्या क्रिसिम्बा (Cresemba) या इंजेक्शनची किंमत प्रत्येकी ८,५०० रुपये असून ते १० वेळा रुग्णांना द्यावे लागते. तसेच  Cresemba कॅप्सूल ह्या गोळ्यांचे एक पाकीट २०,००० रुपये आहे, ज्यामध्ये ७ गोळ्या असतात. प्रयेक रुग्णाला २८ गोळ्यांचा कोर्स दिला जातो. ८०,००० रुपयांच्या गोळ्या तर ८५,००० रुपयांची इंजेक्शन्स व इतर खर्च हा सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मुंबईत सद्यस्थितीत २००० इजेक्शन्सची गरज आहे. आज काळी बुरशी या आजाराने लोक मृत्युमुखी पडत आहेत. पण असे असताना देखील. केंद्र सरकारने राज्य सरकारला हे औषध खरेदी व विक्री करण्यास मनाई केलेली आहे. म्हणूनच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काळी बुरशी या रोगावरील उपचार रुग्णांना मोफत द्यावेत अशी मागणी केलेली आहे.  मुंबई काँग्रेसतर्फे केंद्र व राज्य सरकारकडे मागणी आहे की, काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) हा आजार कोविड संबंधित आजार असल्याने त्याचा समावेश महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात यावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या रोगावर मोफत उपचार घेता येतील. 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस कोरोना उपचारादरम्यान मुंबईसह संपूर्ण राज्यात तातडीने रक्तपुरवठ्याची गरज होती. त्यावेळेस मुंबई काँग्रेसतर्फे १० हजार युनिट रक्त संकलन करण्याचे अभियान सुरु केले होते आणि त्यानुसार काँग्रेसतर्फे संपूर्ण मुंबईत रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती. या अभियानादरम्यान कालपर्यंत मुम्बई कांग्रेस ने  ७ हजार युनिट्स रक्त जमा केले व त्यातील ९५% युनिट्स  सरकारी रुग्णालये व सरकारी रक्तपेढयांना दिले व ५% रक्त  खाजगी रक्तपेढ्यांना द्यावे लागले. कारण सरकारी रक्तपेढ्या व रुग्णालये यांनी  विनंती केली की, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात रक्तसाठा जमा झाला असून अतिरिक्त साठा स्टोर करू शकत नाही व जमा केलेले रक्त २० दिवसांच्या कालावधीत वापरावे लागते. म्हणून अतिरिक्त साठा ठेवू शकत नाहीत. त्यांच्या विनंतीला मान देऊन  आमचे १० हजार युनिट रक्त संकलन करण्याचे अभियान येथेच स्थगित करत असल्याचे जाहीर करत आहोत. भविष्यामध्ये रक्ताची आवश्यकता भासल्यास  आमचे अभियान पुन्हा सुरु करू.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com