Top Post Ad

“मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया?”

 


नवी दिल्ली: “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्‍सिन विदेश क्यों भेज दिया?”  अशी मोहीम सध्या दिल्लीत पोस्टरद्वारे सुरु आहे.  कोरोना लसीकरण मोहिमेवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी ही भित्तीपत्रके चिकटवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी संबंधितांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे शंभर जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये  ई-रिक्षाचालक (३०), शाळा सोडलेला तरुण (१९), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (६१) समावेश आहे.  विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यास सुरुवात झाली.

 कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात दिल्लीत लागलेल्या पोस्टर प्रकरणी 25 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, राजधानीत लावलेल्या पोस्टरची जबाबदारी आम आदमी पक्षाने घेतली आहे. पक्षाने म्हटले आहे की, 

मात्र शहरातील अनेक भागात पोस्टर लावण्याची जबाबदारी आम आदमी पक्षाने (आप) रविवारी स्वीकारली. आपचे ज्येष्ठ नेते दुर्गेश पाठक म्हणाले की, पोलिसांच्या कारवाईमुळे पक्ष थांबणार नाही आणि अशा मोहिमा राबवून संपूर्ण शहर आणि देशात अशी पोस्टर लावण्यात येतील. पत्रकार परिषदेत पाठक यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि ते शेकडो कामगारांना त्रास देत होते. या सर्वांवर मालमत्ता प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८, भारतीय दंड संहितेच्या कलम १88 अन्वये (लोक सेवकाद्वारे कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे) आणि इतर (Prevention of Defacement of Property Act. )  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे दिल्ली पोलिसांना आवाहन आहे की, मला व आमच्या आमदारांना अटक करा पण थोड्या पैशासाठी पोस्टर लावणाऱ्या गरीब लोकांना त्रास देऊ नका. आज  देशभरातील सर्वच लोक प्रश्न विचारत आहेत की प्रधानमंत्री आणि भाजपा सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि इराकसह अनेक देशांना कोट्यवधी लसांची निर्यात का केली ज्यामुळे भारतातील हजारो लोकांचे प्राण वाचू शकले असते.

”दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की आता एकमेकांवर बोट दाखवण्याची वेळ नाही. कोविड-१९ साथीच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना केले. 

 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही रविवारी ट्विट करुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर लसीच्या डोसच्या निर्यातीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील तेच पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. यासोबत राहुल गांधी यांनी त्या पोस्टरचा फोटोदेखील ]ेअर केला आहे. आणि विचारले आहे की, मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. तर सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, पोस्टरच्या माध्यमातून विरोध करणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा पुन्हा करु. प्रियांका गांधी यांनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्षाचे संसद सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या घराबाहेर एक पोस्टर लावत विचारले की, लसीप्रमाणेच पंतप्रधान कोठे गायब आहेत. राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डीएमके यांच्यासह अनेक राजकीय पक्ष ही मोहीम वेगवान करत आहेत. जेणेकरून लसीसाठी केंद्र सरकारवर दबाव येईल.


लस्सीकरणाचे राजकारण..... ऐका सविस्तर 👇👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com