लोककलावंताना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी

मुंबई (चेंबूर)

 कोरोणाच्या पहिले लाटेतून लोक सावरत असतानाच कोरोणाच्यां दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडून प्रचंड हाल सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने तमासगीर, वादक, गायक, कवी,भारुड कलाकार, लावणी, गोंधळी, जोगती, नाटककार, ऑर्केस्ट्रा वाले, कव्वालीवाले, कवी, गीतकार, संगीतकार असो अशा सर्वच गरीब कलावंतांचे प्रचंड हाल सुरू असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण हे लोककलावंत वर्षातील दोनच महिने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा धार्मिक सणवाराला कार्यक्रम मिळतात बाकी दिवशी काही कार्यक्रम नसल्यामुळे घरीच बसून रहावे लागते.

 मागील कोरोणाच्या लाटेमुळे त्यांना ऐन हंगामात घरी उपाशी बसावे लागले आणि तीच परिस्थिती या वर्षीही त्यांच्या समोर उभी ठाकली आहे, त्यातच जर हे लॉकडाऊन असेच सुरू राहिले तर त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. याकरिता  प्रत्येक गरीब व गरजू लोककलावंतांना कोरोना महामारीच्या आणि लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे असे निवेदन चेंबूरचे माजी नगरसेवक रमेश कांबळे सरकार दरबारी करणार असल्याचे सांगितले. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनाही दिले आहे. त्याचप्रमाणे खासदार राहुल शेवाळे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत लवकरच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेऊन ते मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोककलावंतांची व्यथा मांडणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA