
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर राजीव गांधी रुग्णालयातील पीसीआर प्रयोगशाळा ही एकमेव शासकीय चाचणी करणारी प्रयोगशाळा होती. त्यानंतर पाच प्रयोगशाळांची काही काळानंतर त्यामध्ये भर पडली. त्याचा उपयोग शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना झाला. शहापूर, मुरबाड ह्या भागांनादेखील या प्रयोगशाळेचा फायदा झाला. तिथूनही तपासणीसाठी सँपल येऊ लागले. दिवसाला ७०० हून अधिक नमुन्यांची इथे तपासणी होते आणि १,५०० हून अधिक नमुने तपासण्याची क्षमता या लॅबमध्ये आहे.
या पीसीआर प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना डॉक्टर उबाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे भिवंडी, पडघा, उल्हासनगर, बदलापूर, मिरा भाईंदर या ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण करता आल्या, अनेक लोकांना या संबंधीचे प्रशिक्षण ते सातत्याने देत आहेत, जिथे प्रयोगशाळा निर्माण केल्या जात आहेत तिथे त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येते. आतापर्यंत राजीव गांधी ठाणे रुग्णालयातून १,६०,०६९ इतके नमुने तपासणीसाठी आले नमुने त्यापैकी ११,३३९ नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नमूद झाले आहेत. १४ एप्रिलपासून दिवस-रात्र ही प्रयोगशाळा काम करीत असून तेथे डॉ. मिलिंद उबाळे हेही न थकता कार्यरत आहेत. अँटिजेन तपासणीदेखील पालिकेच्या सर्व केंद्रांतून अव्याहत आहेत. आतापर्यंत १०,२७,२६२ इतक्या जणांच्या तपासण्या झाल्या असून, ३८,३६९ अँटिजेन पॉझिटिव्ह आलेत. दिवसातून किमान पाच ते सहा हजार अँटिजेन तपासण्या होतात.
अतिशय नम्र असलेले डॉक्टर या संपूर्ण यशाचे श्रेय ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर तसेच लॅबमधील सहकारी बर्ग, डॉक्टर देवगिरीकर मॅडम, स्थानिक नगरसेवक संपुर्ण महापालिका कर्मचारी यांना देतात. असे कष्टाळू आणि गुणवत्ताधारक डॉक्टर लाभले हे ठाण्याचे भाग्यच आहे. ठाणेकरांचे भविष्य आणि आयुष्य या तज्ज्ञ डॉक्टर्समुळे कायम सुरक्षित राहील, अशी मनोमन खात्री आहे
- डॉ.अरुंधती भालेराव
0 टिप्पण्या