Top Post Ad

शहरातील नालेसफाई व रस्त्याच्या दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

  •  पावसाळ्यापूर्वी करावयाचा कामांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा 
  • नालेसफाई, रस्ते दुरूस्ती वेळेत पूर्ण करण्याचे दिले आदेश
  • अधिकाऱ्यांचा मोबाईल बंद आढळल्यास कडक कारवाईचा ईशारा


ठाणे 

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि सतर्कतेने काम करण्याच्या सूचना देतानाच शहरातील नालेसफाई व रस्त्याच्या दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज संबंधित सर्व विभागांना दिले. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी २४ तास मोबाईल चालू ठेवावेत, कामाच्या वेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाईचा ईशारा डॉ. शर्मा यांनी दिला आहे. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज मान्सूनपूर्व तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे तसेच  सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

        सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरूस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. शहरातील प्रभागसमितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करुन सी 1 व सी 2 इमारती खाली करण्याचे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबरची झाकणे बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.  कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रीत करुन ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

         त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रे या ठिकाणी आवश्यक तो औषधसाठा करून प्रतिबंधात्मक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन 24 तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागाने देखील याबाबत सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com