रेमडेसिव्हीर औषधाचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध कार्यवाही करण्याचे निर्देश


 ठाणे :
कोविड १९ या आजाराने उपचारासाठी वापर होणाऱ्या रेमसिव्हीर औषधाचा पुरवठा वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात कमी असलेने त्याचा काळाबाजार करुन अवाजवी किमतीत विक्री होत असल्याचे राज्यातील काही घटनांवरून निदर्शनास येत आहे.सदर पार्श्वभूमी विचारात घेऊन रेमडेसिव्हीर औषधाचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध होणेसाठी कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसीव्हीर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यासाठी खालील नमुद केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.साथ रोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ हा ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेला आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (काविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करुन खंड २, ३ व मधील तरतूदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. उपाययोजना नियम, २०२० अन्वये जिल्हाधिकारी ठाणे यांना जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहेत.  जिल्हा स्तरावर रेमडिसिव्होरचा पुरवठा सुरळीत होणेसाठी जिल्हा स्तरावर रेमसिव्हीर  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात  आलेल्या आहेत.

औषध नियंत्रण (भारत सरकार) यांनी रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा उपयोग For treatment of suspected or laboratory confirmed Corona Virus desease] २०१९ (Covid १९) in adult and children hospitalized with severe disease चे  उपचार करणेसाठी मंजूर दिली आहे. त्याचबरोबर पुढीलप्रमाणे Warming देखील दिली आहे. Warning To be sold by retail on the prescription of specialist for use in hospital/institutional set up only. तसेच Regulation मध्ये "Empowered Officer" च्या व्याखेत आयुक्त, आरोग्य सेवा संचालक आरोग्य सेवा (DHS-I & II) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), सर्व विभागीय आयुक्त(महसूल), सर्व जिल्हाधिकारी व सर्व महानगरपालिका आयुक्त यांचा समावेश केला असून त्यांना त्यांच कार्यक्षेत्रात आवश्यक उपाययोजना करणेसाठी प्राधिकृत करणेत आले आहे.

रेमडेसीव्हीर समन्वयन व संनियंत्रण  पथक उपजिल्हाधिकारी  (सामान्य प्रशासन) बाळासाहेब वाकचौरे ,तहसीलदार(सर्वसाधारण) आर व्ही तवटे,संपर्क क्रमांक-8369413727,सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग,एम आर पाटील, संपर्क क्रमांक- 8788233894 , औषध  निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, प्राची चव्हाण संपर्क क्रमांक-9820592112 असे आहेत.

नियंत्रण कक्ष क्रमांक -०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ व टोल फ्री क्र. १०७७ असा आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी, नि.अ.पावसकर संपर्क क्रमांक ९८१९८५६५८७, अन्न सुरक्षा अधिकारी, दि. स. हरदास संपर्क क्रमांक - ९८९२१८०७६०, महसूल सहायक, कुणाल भालेराव संपर्क क्रमांक - ८२९१३५०९२७, महसूल सहायक, सयद सुलेमान संपर्क क्रमांक - ९८१९४०४४११,महसूल सहायक, स्वप्नील चव्हाण संपर्क क्रमांक - ९७६४४०८५४५, हे अधिकारी  व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, व्य. व. वेदपाठक संपर्क क्रमांक ९८६७७११३५०, अन्न सुरक्षाअधिकारी, प्र. पु सुर्यवंशी संपर्क क्रमांक - ८३६९५८६९५२, अव्वल कारकून, राजेश नरुटे संपर्क क्रमांक - ८१०८५०९९७४,महसूल सहायक, प्रविण उबाळे संपर्क क्रमांक - ७०३८६६६२८७, महसूल सहायक, देवेंद्र सावंत संपर्क क्रमांक - ९८३३७२०१७२ हे अधिकारी व कर्मचारी  नियंत्रण कक्ष पथक म्हणून दुपारी ३ ते १० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. म. देशमुख संपर्क क्रमांक - ९९२०९५५५६२, अन्न सुरक्षा अधिकारी,रा.स.ताकाटे संपर्क क्रमांक-९४०४९७३१७४, महसूल सहायक किरणकुमार सुरडकर संपर्क क्रमांक - ९५४५८८१८८३,महसूल सहायक, गणेश मोरे संपर्क क्रमांक - ८०८०७८६४५६,शिपाई, ओमकार वैती, संपर्क क्रमांक - ८१६९१७१८१० हे अधिकारी व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून रात्री १०  ते सकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध  राहतील.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60,भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम,1897 व भारतीय दंड संहिता,1860 मधील कलम 188 तसेच औषधे सौदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1