Top Post Ad

चैत्यभूमीसमोरील बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्यास स्थानिक आमदाराचा महापालिकेला विरोध

मुंबई

 चैत्यभूमीचे महत्व कमी करण्याकरिता जवळच असलेल्या धर्मशाळेवर बेकायदेशीरपणे मजला वाढवण्याचे काम जातीयवादी आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून सुरु आहे. या बेकायदेशीर  बांधकामाचा पहिला मजळा पूर्णपणे तोडण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. याची दखल घेऊन मुंबई महानगर पालिकेने हे बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई आज सकाळीच सुरु केली होती. मात्र ऐन वेळी  स्थानिक आमदार सरवणकर यांनी हस्तक्षेप करून ही कारवाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थांबवण्यास भाग पाडले.  ही वार्ता आंबेडकरी जनतेमध्ये वाऱ्यासारखी पसरली असून आता या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि हे संपूर्ण बांधकाम जमिनदोस्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल अशा इशारा बहुजन समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी दिला आहे. तसेच जातीवाद करणाऱ्या या आमदारावर महापालिकेच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही इंगळे यांनी केली आहे. 

चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराशेजारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर स्मशानभूमीतील धर्मशाळाचे छप्पर बसवण्याच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम भागोजी कीर स्मशानभूमीत जांभेकर महाराज पथ, शिवाजी पार्क, दादर येथे केले आहे. नागरिकांच्या सोयीसुविधा करता बांधण्यात आलेल्या विधी करावयाच्या हॉलची पुनर्बाधणी स्थानिक आमदार शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी पाठपुरावा करून पूर्ण केले आहे असे त्यांनी सहाय्यक आयुक्तांना लिहलेल्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे बांधकामाबाबत सतत पाठपुरावा केलेला दिसतो. सी.आर.झेड चे नियम असे आहेत की वरचा मजला बांधकाम करता येत नाहीत ते नियम डावलून स्मशानभूमीतील धर्मशाळा याचे छप्पर बसवण्याच्या नावाखाली बांधकाम केले आहे यासाठी जिल्हा नियोजन व विकास कार्यक्रमांतर्गत स्मशानभुमी सुधारणा करण्याकरता निधी उपलब्ध सुध्दा झाला. सी.आर.झेड.चे नियम असताना त्याच्यामध्ये पहिला वरचा मजला त्याला छप्पर असे उल्लेख केला आहेव ते बसवले आहे आणि त्याच्यावरती बांधकाम करणे नियमात बसत नसतानासुद्धा हॉलचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली जाणीवपूर्वक हे बांधलेले आहे. यामुळे ऐतिहासिक चैत्यभूमी मध्ये जाण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे ते काही प्रमाणात झाकले जात आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे निश्चितपणाने जातीवादी आमदाराच्या माध्यमातून काहीतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करून संघर्ष पेटेल किंवा पेटवण्याचा दृष्टीने हे कारणीभूत ठरेल हे नाकारता येत नाही. याबाबत आमदारांनी "ना हरकत पत्र" मिळवण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. सदर बांधकाम हे अनधिकृत असताना सुद्धा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी कंत्राटदारामार्फत हे बांधकाम केले आहे. 

तसेच बांधकामासाठी उपलब्ध झालेला निधी एवढा मोठा आहे की त्यामुळे तिथल्या असणाऱ्या कंत्राटदार, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संघनमताने हे काम केलेले दिसून येते. हॉल साठी दुरुस्तीच्या नावाखाली जी प्लस वन ( 641) हे बांधकाम केलेले आहे त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टरवर व संबंधित अधिकाऱ्यांवर महानगरपालिकेने परवानगी दिल्यामुळे आणि जिल्हाधिकारी यांनी निधी दिल्यामुळे शासन कशी कारवाई करते ते पाहणे आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांमध्ये थोडंसं काही बांधकाम किंवा कुठल्या ठिकाणी थोडंसंच बांधकाम झालं तर तात्काळ निष्कासणाची कारवार्ड करणाऱ्या महानगरपालिकेने सदर चैत्यभूमी प्रवेशद्वार झाकत असताना जाणीवपूर्वक डोळेझाकपणा केलेला दिसतो. यामधून महापालिकेतील अधिकाऱ्यांची जातीयवादी मानसिकता दिसून येते.


आम्ही संविधान मानणारे आता अंत आमचा पाहु नका 

माननीय
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब

आपणास सांगण्यास अत्यंत खेदाची बाब आहे की आपल्या सरकारमधील असे काही रथी महारथी आहेत जे असंविधानिक काम करून प्रशासकीय कामाला आपल्या घरच काम समजतात आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला आपले नोकर यातले एक महारथी #जी-नॉर्थ- दादर चे स्थानिक #आमदार सदा सरवनकर यांच गुंडेशाही प्रवृत्तीचे समाजाला व मतदारराजाला प्रदर्शन झाले .प्रशासकीय कामाला थांबवा नाहीतर मी कार्यरत कर्मचाऱ्यांवर दगडफेक करेल अशी धमकी  आमदार यांनी दिली .

#मुख्यमंत्री महोदय आणि #मुख्यमंत्र्याच्या हातात असणारी महानगर पालिका जी-नॉर्थ अधिकारी यांच्या कामात अडथळा निर्माण करून # कार्यरत कर्मचाऱ्यांवर दगडफेक करेन अशी धमकी देणाऱ्या आमदारावर काय कारवाई करणार? # चैत्यभूमी हे आमच्या प्रेरणेच ठिकाण आहे त्या परिसरात कोणत्याही प्रकारच विद्रुपीकरण आंबेडकरी अनुयायी व आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही त्यामुळे चैत्यभूमी लगत अनधिकृत बांधकामावर स्थानिक आमदार  सदा सरवनकर यांच्या असंविधानिक कामामुळे महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना दगडफेक करणाऱ्या माणसाला कायदेशीर कारवाई करून चैत्यभूमी चा दर्शनीभाग झाकणाऱ्या अनधिकृत बांधकाम त्वरित तोडण्यात यावे अशी # महानगरपालिका व #महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री  # उध्दवजी ठाकरेसाहेब #आपणास_विनंती

- #नितिन भाऊ मोरे
#जयभिम आर्मी - 
संस्थापक/अध्यक्ष


चैत्यभूमी शेजारचे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर आंदोलन -गौतम सोनवणे

चैत्यभूमी शेजारी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे मुंबई मनपा ने रिपाइं ला आश्वासन दिले आहे. चैत्यभूमी शेजारच्या हिंदू स्मशानभूमी आणि तेथील धर्मशालेला रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही. तेथे 30 फूट अनधिकृत बांधकाम केल्याने चैत्यभूमी चा स्तूप झाकला जात आहे.ते 30 फूट अनधिकृत बांधकाम तोडावे आणि तेथील धर्मशाळा चांगली बांधावी ही रिपाइं ची मागणी आहे. मुंबई मनपा ने तेथील अनधिकृत 30फूट बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केल्या नंतर स्थानिक आमदार सदा सरवनकर यांनी मनपा ची कारवाई रोखली दगडफेकीची धमकी दिली. त्यांच्यावर पोलीस प्रशासन योग्य कारवाई करील. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस आणि मुंबई मनपा ने हाणून पाडला आहे. मनपा चे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल साहेब यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम नक्की निष्कसित करण्याचे आश्वासन रिपाइं ला दिले आहे. सदर अनधिकृत बांधकाम निष्कसित नाही झाले तर रिपाइं आंदोलन छेडेल -

गौतम सोनवणे
--रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया - मुंबई अध्यक्ष 


 आमदार सदा सरवणकर यांचा_जाहीर  निषेध निषेध निषेध....

चैत्यभूमिच्या समोर  असलेल्या धर्मशाळेचे अनधिकृत बांधकाम करु नये व अनाधिकृत बांधकाम केल्यास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते ते बांधकाम पाडतील असा इशारा  मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त यांना रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी राज्यमंत्री मा.अविनाशजी महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. गौतमजी सोनवणे , युवक अध्यक्ष रमेशजी गायकवाड यांच्यासह  रिपब्लिकन नेते  प्रविणजी मोरे  , पँथर नेते किसनजी रोकड़े , रतनजी आस्वारे , तालुकाध्यक्ष गौतमजी गायकवाड़  , आयटी सेलचे मुंबई प्रदेश अध्यक्ष उमाजी सपकाळे , रमेशजी पाईकराव . यांच्यासह रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी  दिला होता  मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आसतांना  आमदार सदा सरवणकर यांनी बेकायदेशीर बांधलेल्या धर्मशाळेचे बांधकाम तोडण्याचे काम थांबवले आहे यावरून यांची मानसिकता कळते . आमदार सदा सरवणकर यांचा जाहीर निषेध चैत्यभूमी दिसु  नये अशाप्रकारे बेकायदेशीर रित्या केलेल्या सरकारी कामात अरेरावीने अडथळा आणत म्हणतो जर बांधकाम तोडायचं थांबले नाही तर मी दगडफेक करेल..
 आमदार सदा सरवणकर यांचा_जाहीर  निषेध निषेध निषेध....

महेंद्र_सोनवणे.
अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया आयटी सेल..





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com