Top Post Ad

लॉकडाऊनचे राजकारण....


 राज्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुण्यातील एका वडापाव विक्रेत्याने मुख्यमंत्री साहेब आम्हाला विष द्या' असे म्हणत फेसबुक लाईव्ह केले. सहाजिकच या लाईव्हमुळे अनेकजण त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत होते, एवढेच नाही, तर राज्यातील आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल माध्यमांनी देखील या फेसबूकला प्रसिद्धी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विक्रेत्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. संबंधित वडापाव  विक्रेत्याला भेटायच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांनी त्या परिसराचा आढावा घेतला, तेव्हा संबंधित कार्यकर्ता  भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.  राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना म्हणजे अर्थात भाजपच्या नेत्यांना दूरध्वनी केल्यानंतर काही निर्णय घेतले असले, तरी भाजपा मात्र यातील राजकारण करायचे काही सोडत नाही. फेसबुक लाईव्ह करून 'आता आम्हाला विष द्या' असे म्हणणारा कथित वडापाव विक्रेता पुण्यातील भाजपचा पदाधिकारी निघाला. इव्हेंट मॅनेजमेंटचे पद असलेला हा पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपवर तुटून पडले... म्हणाले, हा तर नीच राजकारणाचा कळस झाला! 

लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते स्वतःची ओळख दडवून सामान्य माणसाच्या रूपात लोकांना संभ्रमित करत आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या सूनबाईचा व्हिडिओ भाजपच्या सोशल मीडियाने पक्षाच्या प्रचारासाठी वापरला. भाजपची सोशल मीडिया तोंडावर आपटल्यानंतर ही आमची चूक नाही, ज्यांना हे काम दिले होते, त्यांनी ही चूक केली असे सांगितले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळात देखील हे आपले सरकार; होय मी लाभार्थी, अशा स्वरूपाची जाहिरात राज्यात केली जात होती. त्यातीलही सत्यता लोकांनी वेळोवेळी समोर आणली होती, तरीदेखील भाजपची खोड ही काही केल्या जात नाही.  

यासंदर्भात बारामती तालुक्‍यातील बाबुर्डी गावचे सरपंच व राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पोमणे, माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव, सोशल मिडीयाचे सक्रिय कार्यकर्ते योगेश सावंत यांनी या कथित वडापाव विक्रेत्यास भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंट प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होतीं व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत ही नेमणूक झाली होती असा दावा केला. 

यासंदर्भात ज्ञानेश्वर पोमणे म्हणाले, हा भाजपच्या नीच राजकारणाचा कळस झाला आहे. लोक संकटात असताना कोरोना हे एक षडयंत्र आहे, असे लोकांच्या मनावर बिंबवायचे. त्यातून लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा. सरकारविरोधी वातावरण तयार करायचे, मात्र त्यापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण कसे वाढतील याची आखणी करायची आणि राज्याला संकटात टाकायची एवढी नीच पद्धत यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात विरोधकांनी केली नव्हती. अशा प्रकारचे विरोधाचे राजकारण कधीच चालत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र भाजप अशा प्रकारे अत्यंत खुनशीने, व्यक्तीद्वेषाने पछाडून अशा प्रकारचे राजकारण करत आहे. ते म्हणाले, भाजपचा हा डाव सामान्य लोकांनी ओळखावा, 

कारण कोरोना हे षडयंत्र नाही. ज्यांचे नातेवाईक दवाखान्यांमध्ये शेवटचा शास घेत आहेत, किंवा ज्यांना अतिशय गंभीर अवस्था झाली आहे अशापर्यंत पोचून नीट माहिती घ्या आणि त्यानंतर कोरोना हे षड्यंत्र आहे या भाजपच्या विकृती प्रचाराच्या कृतीवर विचार करावा. खरे तर या पदाधिकाऱ्याने आपण भाजप पदाधिकारी आहोत असे सांगितले असते, ओळख पटवली असती आणि त्यानंतर आपल्या धंद्यावर झालेला परिणाम सांगितला असता, तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. मात्र तसे न करता ही भाजपची पद्धत आहे की, मी कोणत्याच पक्षाचा नाही, असे सांगत नेमकं पक्षाची बाजू मांडायची ही त्यांची फार जुनी खोड आहे. सध्या त्रास सर्वांनाच सुरू आहे, परंतु याचा अर्थ लोकांना कोरोनाच्या खाईत लोटून आपली पोळी भाजणे हा त्याचा भाग बनू शकत नाही.


https://www.facebook.com/oneanilsid/videos/2561076734195316

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com