Top Post Ad

... तर संबंधीतांविरुध्द कायदेशीर कारवाई - जिल्हाधिकारी


 ग्रामीण क्षेत्र, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश
ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अंबरनाथ, कुळगाव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण क्षेत्र, तसेच शहापूर, मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते 12पर्यतचे सर्व शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, निवासी शाळा दिनांक १ एप्रिल २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहे. दहावी व बारावीबाबत मुलांच्या व पालकांच्या संमतीने उपस्थिती व वर्ग चालविणे ऐच्छिक असेल असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानुसार शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहणार आहे. या आदेशाची अमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ठाणे जिल्हयातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्हयातील उर्वरित संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ ते १२ वी.च्या वर्गांसाठी, सर्व प्रकारच्या शाळा व वसतिगृहे यामध्ये दि.२७/०१/२०२१ पासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आलेली होती. जिल्हयाच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील केवळ इयत्ता ५ ते ८ वी च्या सर्व प्रकारच्या शाळा व वसतीगृहे दि.१५/०३/२०२९ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेचे आदेश निर्गमित करणेत आले आहेत इयत्ता ५ वी ते १२ चे वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे ब निवासी आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाचे अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा दि.२२/०३/२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेबाबत देखील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तथापि, ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात देखील कोविड-१९ चे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी कोरोना विषाणूचे नविन प्रकार आढळत असल्याचे शासनाद्वारे कळविले जात आहे. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून उपोद्घातातील अ.क्र.६ व ७ मधील आदेशामध्ये अंशत: बदल करणेची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्हयातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र वगळून अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील आणि जिल्हयातील संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते ९२ चे वर्गासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे व निवासी शाळा, कोचिंग क्लासेस दि.०१/०४/२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात. परंतु इयत्ता १० वी व १२ वी तील मुलांसाठी पालकांचे संमतीने उपस्थिती व वर्ग चालवणे ऐच्छीक राहील. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहील. उक्त आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. त्याबाबतचे सर्व समन्वयन व  संनियंत्रण आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभाग, नगर पंचायत व जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांची करणेचे आहे सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्‍तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५९१ ते ६०, भारतीय साध रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आदेश राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, ठाणे पारीत केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com