सुमारे तीन वर्षांपासून रखडलेल्या खुटघर- शहापूर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार

शेतकऱ्यांचा विरोध मावळल्याने खुटघर- शहापूर रस्त्याचे काम पुढील आठवड्यात होणार सुरू

शहापूर : मागील पावणेतीन वर्षांपासून रखडलेला आणि शहापूर तालुक्याचा केंद्रबिंदू असलेला रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ - शहापूर - मुरबाड- म्हसा - कर्जत - खोपोली या नवीन महामार्गाचे काम गुरुवारी शहापूर येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या सकारात्मक आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे अस्तित्वातील रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मुंबईचे कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ - शहापूर - मुरबाड- म्हसा - कर्जत - खोपोली या नवीन महामार्गाचे काम मागील तीनवर्षांपासून धीम्या गतीने सुरू आहे. मात्र या महामार्गा अंतर्गत खुटघर ते शहापूर या रस्त्याचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने बंदच होते त्यामुळे रस्याची दैनावस्था होऊन रस्त्याला पडलेले खड्डे, धुळीचे साम्राज्य झाले होते पावसाळ्यात तेथून जाणे जिकरीचे होत होते. हा रस्ता शहापूर तालुक्याचा केंद्रबिंदू आहे. हे किती दिवस चालायचे म्हणून आणि आता पावसाळा जवळ आल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच सहसंचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक गुरुवारी शहापूर येथे घेण्यात आली 

या बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना सांगितले  केंद्र शासनाने हा रस्ता सव्वीस मीटर रुंदीचा बनविण्याची मंजुरी दिली असून पैसे देखील आलेले आहेत. हा रस्ता १९६०-१९७० चा राज्य मार्ग आहे. सातशे मीटर रस्ता हा जुन्याच  जागेवर बनवत असून त्यापुढील रस्त्यासाठी नवीन जागेचे ७५ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे सांगत दोन दिवसात तुम्ही आम्हाला तुमचा निर्णय सांगा आशा सूचना शेतकऱ्यांना केल्या नाहीतर सोमवार पासून आम्ही आमच्या दहा मीटरच्या रस्त्याचे काम सुरू करू ते काम कोणीही आडवू शकत नाही. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर संयुक्त मोजणी करून मोजणीत जे काही वाढीव निघेल तर त्याचे जास्त पैसे नियमात देण्यासाठी महामंडळा कडून सहकार्य करण्यात येईल.

तुम्ही महामंडळाला सहकार्य करा महामंडळ तुम्हाला करेल असे देखील खिस्ते यांनी बैठकीत शेतकऱ्यांना समजावून सांगितले. महाराष्ट्र शासनाचा २६ ऑक्टोबर २०१० च्या शासन निर्णयानुसार २० वर्षांपूर्वी पेक्षा जास्त जुना जो अस्तित्वातील रस्ता आहे. त्याचा मोबदला दिला किंवा दिला नाही किंवा शेतकऱ्यांनी मोफत जागा दिली. या सर्व गोष्टी काही न पाहता त्याचा मोबदला यापुढे देण्यात येऊ नये , दिला असे गृहीत धरून या पुढे मोबदला देण्याचे कुठलेही प्रस्ताव शासनाकडे सादर करू नयेत असे शासन निर्णयात नमूद केले आहे. असे शेतकऱ्यांना समजावून सांगितले त्यामुळे शेतकरी सकरात्मक झाले असून या रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते यांनी दिली.

"शेतकऱ्यांना शहापूर तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय लक्षात आली आहे. त्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे या रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करून हा रस्ता २० मे पर्यंत पूर्ण केला जाईल.  " -
(रमेश खिस्ते, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड,मुंबई)

" ३० मीटरच्या मार्जिनमध्ये आमच्या जमिनी शासनाने कोणताही मोबदला न देता घेतल्या आहेत. त्यामुळे शासनाने याचा मोबदला आम्हाला देण्याची प्रक्रिया करून काम चालू करावे. " -
( शेतकरी, ऍड. हरेश डिंगोरे, शहापूर)
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA