
ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची माहिती मिळताच काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावर सचिन सावंत यांनी लागोपाठ तीन ट्विट करत ही टीका केली आहे. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीसुध्दा धावले?, असा सवाल सावंत यांनी केला आहे. '
कोरोना महामारीमध्ये रेमडेसिवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का? आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्या डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध करत आहोत, असंही म्हटलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वत:कडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत. ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवडयकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

ब्रुक फारमा कंपनी मालकाला सोडवण्यासाठी फडणवीस, दरेकर रात्री पोलीस स्टेशनला धावत पोहचले; कारण ब्रुक फारमा कंपनीचा हा मालक संपूर्ण फारमा कंपन्यांच्या असोसिएशनवर च्या प्रमुख पदाधिकाऱ्याने पैकी असून, अमित शहा व गुजरातच्या भाजप नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. या फारमा कंपनीच्या मालकाने हजारो रेमिडीसीवर इंजेकशनचा साठा स्टोक करून ठेवलेला आणि त्यातले रेमिडीसीवर महाराष्ट्राला देऊ नका असे केंद्र सरकारने फारमा कंपन्यांना सांगितले होते. तसेच या फारमा कंपन्या आणि असोसिएशन कडून भाजपला करोडो रुपयांचे फंड मिळतात म्हणून त्यांचे संरक्षण हि त्यांची नैतिक जवाबदारी आहे. आणि म्हणूनच रात्री १२.३० वाजता हे नेते पोलिस स्टेशनला तातडीने पोहोचले अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे.
0 टिप्पण्या