2021 जानेवारी ते मार्च अखेर पर्यंत एकुण 486 अकस्मात मृत्युठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेकडून माहे जानेवारी 2021 ते मार्च 2021 अखेर पर्यंत एकुण 486 प्रकरणे या कार्यालयात अकस्मात मृत्यु  नोंद झालेली आहे.

                फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 174 अन्वये सदर व्यक्तींच्या मृत्युच्या दर्शनी कारणांचा अहवाल संबंधीत पोलीस विभागाकडुन या कार्यालयास प्राप्त झाला असुन त्याबाबत चौकशी सुरु आहे. त्यानुसार त्यांचेकडील प्राप्त प्रकरणांनुसार 486 मयत इसमांची यादी (जाहिरनामा) मयतांच्या मृत्यूचे कारण व अकस्मात मृत्यू समरी नोंद, पोलीस स्टेशनचे नाव व मृत्यूचा प्रकारासह खालील कार्यालयांमध्ये प्रसिध्द करणेत आलेली आहे.   जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे संकेतस्थळावर (www.thane.nic.in) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, ठाणे पत्ता- 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे  तहसिलदार कार्यालय, ठाणे  पत्ता - जिल्हा परिषद ठाणे समोर, स्टेशन रोड ठाणे,  सदर मयत इसमांच्या मृत्यूच्या कारणाबाबत फौजदारी प्रकिया संहिता, 1973 चे कलम 176 (2) नुसार मयत व्यक्तीचे मृत्युचे कारण दर्शविणारे आदेश व चौकशी करणे प्रस्तावित आहे.

              मयत इसमांच्या मृत्युबाबत/कारणाबाबत त्यांचे नातेवाईक, हितसंबंधित अथवा अन्य कोणासही संशय/तक्रार/हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे/साक्ष देणेची असल्यास संबंधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्या पासुन 07 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे विभाग ठाणे, पत्ता- 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे कार्यालयीन वेळेत हजर राहुन आपले म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरुपात सादर करावे असे  आवाहन ठाणे विभाग उपविभागीय दंडाधिकारी  अविनाश शिंदे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या