महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना


मुंबई पोलीस कमिशनर यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला, खरं की खोटं मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याची चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांनी त्याचे वेगवेगळे कंगोरे दाखवायला सुरुवात केली. उद्योगपती अंबानी यांच्या घराच्या जवळ स्पोटक असणाऱ्या गाडी पासून हा प्रवास सुरू झाला, सचिन वाजे प्रकरण असेल किंवा अनेक त्याचे कंगोरे समोर येऊ लागले. या सगळ्या मधील महाभयंकर गोष्ट म्हणजे संभाषणांमध्ये अधिकारी वर्गाकडून बार असेल किंवा इतरही माध्यमातून जवळजवळ शंभर कोटी जमा करून देण्याची भाषा येऊ लागली आणि या बाबतीमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क होऊ लागले. माझ्या असं लक्षात आलं या महाराष्ट्राला वेगळी पुरोगामीपणाचा इतिहास आहे, 

सक्षम आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या राज्यकर्त्यांची व अधिकाऱ्यांची एक पार्श्वभूमी आहे. मला सहजच वाटलं असं जर पुर्वी महाराष्ट्रात घडले असतं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण , वसंतदादा पाटील किंवा शंकरराव चव्हाण यांनी काय केलं असतं?  मला असं वाटतंय त्यांनी आपल्या पायातल्या पायतानांनी दोषींना झोडून काढलं असतं असं मला वाटतं. आज राज्यात खऱ्या अर्थानं नेतृत्व करणाऱ्यांनी हे राज्य बेजबाबदार राज्यकर्ते व भांडवलदारांच्या पायाशी लोटांगण घालणारी एक राजकीय व्यवस्था निर्माण केलेली आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर गोरगरीब जनता आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून पोलीस स्टेशनला असेल किंवा शासकीय कार्यालयात चकरा मारताना दिसते, मात्र मुंबईत आर्थिक राजधानी मध्ये राज्यकर्ते आणि त्यांचे असणारे सहकारी, खाजगी सचिव आणि इतर अधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत हे खरंच अशोभनीय गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि खऱ्या अर्थानं अभिमानानं या महाराष्ट्रामध्ये त्याच्या गौरवगाथा राहणाऱ्या लोकांना शरमेनं मान खाली घालावी लागत आहे. 

मंत्रीमहोदय बलात्कारासारख्या गंभीर घटनांच्या मध्ये गुंतणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे, खंडणी मागितल्या सारखं गुंडगिरी आणि राज्यकर्त्यांनी दरोडेखोरांच्या सारखं वागणं या महाराष्ट्राने कधीही पाहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खळखळाट, गरिबांसाठी बजेट वापरले जात नाही, मागासवर्गीय यांच्यावर अन्याय होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजरोसपणे ह्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला खतपाणी घालणारे आणि त्याच्यावर आपला मनमुराद हात मारणारी व्यवस्था आपल्याला दिसून येते. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने या महाराष्ट्राची मान शरमेने झुकवलेली आहे. विरोधी पक्षाने आपली जबाबदारी ओळखून खऱ्या अर्थानं सरकारच्या दुष्कृत्यावर नेमकेपणाने बोट ठेवून या महाराष्ट्राच्या जनते समोर सरकार चा खरा चेहरा उघड केला. सुरूवातीला वेगवेगळ्या प्रकारचे विरोधी पक्ष आरोप करत असताना असं वाटत होतं की ह्या आरोपांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होते परंतु आज घडलेल्या घटनेवरून हे स्पष्ट झालं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राज्य करणारी जी परंपरा होती जी ऐतिहासिक गौरवशाली परंपरा होती ती तात्कालिक राज्यकर्त्यांनी मोडीत काढली आहे, असे मला वाटते.

प्रविण मोरे
प्रवक्ते : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया


https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_55.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA