Top Post Ad

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन, विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांमध्येच होणार


 दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत, यापूर्वी १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांचे परिक्षा नंबर ते शिक्षण  घेतलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोडून इतरत्र येत होते. मात्र यंदाच्या वर्षी असे होणार नसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या  शाळांमध्येच त्यांच्या परिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठिद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिक्षा केंद्रावर  जाण्यासाठी प्रवास करावा लागणार नाही. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.  इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ यां कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तसेच कोरोनामुळे सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव कमी झाला  असल्याने यंदाच्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षेचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविण्यात आल्याची माहीतीही त्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल)परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार असून या प्रात्यक्षिक परिक्षा या गृहपाठ पध्दतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे ठेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

१०वी आणि १२ वी परिक्षेच्या तारखा जाहिर झालेल्या आहेत. मात्र या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्यास को-रो-नाची लक्षणे दिसत असल्यास किंवा लॉकडाऊन, संचारबंदी लागू केल्यामुळे परिक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा जून महिन्यात परिक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सदरच्या परिक्षा कालवधीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तर शहरी भागात ठराविक ठिकाणी या परिक्षा निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी पुरवणी परिक्षा अर्थात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. या परिक्षेची केंद्रे शहर व ग्रामीण भागात ठराविक ठिकाणी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान  विद्यार्थ्यांच्या एकूणच सुरक्षिततेसाठी विद्यार्थी जेथे शिकत असेल त्या शाळेतच परीक्षा घेण्याचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी लेखी सुचनेद्वारे शिक्षणमत्र्यांना कळवले होते. तसेच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांपैकी किमान ५० टक्के प्रश्न हे निर्माण केलेल्या प्रश्न बँकेतील असावेत, दोन पेपरमधील तारखांचे अंतर दोन ते तीन दिवसांचे ठेवावे. रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परीक्षास्थळी परीक्षावेळी सॅनिटायझेशनची व्यवस्था अथवा जबाबदारी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवावी, अन्यथा राज्य शासनाने त्याकरिता संस्थांना अनुदान द्यावे. तसेच सीबीएसई बोर्डाप्रमाणे १० वीच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांना द्यावी. परिक्षेच्या तारखा राज्यभर एकच असाव्यात आणि स्थानिक संबंधित शाळेतील प्रश्नपत्रिका, मॉडेल प्रश्नपत्रिकांमधून एक निवडावी असेही केळकर यांनी सुचविले आहे.दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा आवश्यक ते बदल करून परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करावा आणि निकोप वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात, अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली होती. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com