बड्या विकासकाच्या स्वार्थापोटी कुलाबा येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेलाच


मुंबई
 अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुलाबा येथील एसआरए प्रकल्पाचा प्रश्न तत्काळ सोडावा व स्थानिक ५ हजार झोपडपट्टी वासियांना हक्काचे घर तत्काळ द्यावे यासाठी कुलाबा येथील झोपडपट्टी धारक आक्रमक झाले आहेत. आपल्याला न्याय मिळवून द्यावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर नगर व श्रीगणेशमूर्ती नगर कफ परेड बॅकबे रेक्लेमेशन एसआरए गृहनिर्माण संस्था (नियोजित) या संस्थेचे  पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. याबाबत नुकताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण बैठक पार पडली या बैठकीत एलओआय (लेटर ऑफ इंटेंट) साठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.  यावेळी संस्थेचे प्रवर्तक प्रशांत घाडगे , प्रमुख सल्लागार विनायक वेंगुर्लेकर, प्रमुख मार्गदर्शक शरदजी गावकर , वडाळा आनंद नगर एस आर ए चे मुख्य प्रवर्तक व्दारकानंद पाटील , मुख्य प्रवर्तक प्रकाश घाडगे आदी उपस्थित होते.

 मुंबई शहरात अनेक भागात झोपडपट्ट्यांचा वेढा पडलेला आहे. कुलाबा येथील झोपडपट्ट्या शहराच्या विकासा आड येत असल्याचा बनाव करीत ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचले जात आहे. परंतु येथील नागरिक अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे  एस आर ए च्या माध्यमातून पुनर्वसन करणे गरजेचे आहे अशी मागणी होऊ लागली आहे . या ठिकाणी तब्बल ७ हजार झोपडपट्ट्या आहेत, यापैकी ५ हजार स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन एस आर ए प्राधिकरण यांच्याकडे एलओआय (लेटर ऑफ इंटेंट) मिळाला यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ एका बड्या विकासकाच्या स्वार्थापोटी व त्यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नुकताच झालेल्या बैठकीत ५ हजार पात्र झोपडप्टीधारक यांच्यापैकी मुख्य प्रवर्तकांची निवड केली गेली. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत स्थानिक रहिवाश्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सस्थचे प्रवर्तक प्रशांत घाडगे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या