जय महाराष्ट्र चैनल वर लक्षवेधी कार्यक्रमात "संजय राऊत आणि शरद पवारांचा चाललय काय" या चर्चेमध्ये जयंत मानकर यांनी अतिशय मूलभूत विषय मांडला आणि तो विषय असा होता की, संजय राऊत मुंबईत असताना शिवसेनेचे खासदार असतात आणि दिल्लीत गेल्यानंतर ते राष्ट्रवादी होतात आणि शरद पवारांचे निकटवर्तीय व शरद पवार साहेबांना जे अपेक्षित आहे ते बोलतात. सदर अनुषंगाने महाराष्ट्र मध्ये आणि भारतामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, मला असं वाटतंय की भारतीय राजकारणात एक कर्मठ आणि एकनिष्ठ असण्याचे एक परंपरा होती मात्र आता अनेक राजकीय प्रसंगातून आणि युती - आघाडी च्या माध्यमातून असं दिसून येत आहे की प्रत्येक पक्षामध्ये एक असा गट असतो तू राहतो तर स्व:तच्या पक्षात मात्र पक्षात राहून जो विरोधक असतो त्याचे किंवा ज्याचा आपल्याला फायदा होणार असतो त्याचे काम करत असतो.
पश्चिम बंगाल ची निवडणूक पाहता त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस समोरासमोर संघर्ष उभा राहिला असताना पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पक्षांनी खास करून काँग्रेसने तृणमूल काँग्रेस बरोबर आणि इतर पक्षांनी सोबत राहून भारतीय जनता पार्टी चा सामना करावा अशी भावना सुरुवातीला व्यक्त होताना दिसत होती मात्र जागावाटपाच्या चर्चेतून आणि एकूणच ममता बॅनर्जी आणि मोदी पर्यायानं तृणमूल काँग्रेस आणि भाजपा असा संघर्ष दिसतो त्यामुळे ममता बॅनर्जींना पुरोगामी विचारांची ताकद देण्याचा विषय निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणार काँग्रेसमधील एका गटाने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला निवडणुकीचा निर्णय काय होईल माहित नाही परंतु ममता बॅनर्जींच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आणि भारतीय जनता पार्टीला सोप्या गोष्टी काँग्रेस आणि काही पुरोगामी विचाराच्या पक्षाने केलेले दिसून येते.
बिहार च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल असा सामना सुरू झाला, काँग्रेस पक्ष सोबत राहील अशी परिस्थिती निर्माण झाली ते सोबत आले परंतु राज्यांमधली आपली ताकद लक्षात घेता अवाच्या सव्वा जागा मागून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या समोर तेजस्वी यादव रूपानं उभं राहिलेलं मोठ आव्हान काँग्रेसच्या जास्त मागितलेल्या जागा आणि पर्यायाने तेवढ्या जास्त पराभूत झालेल्या जागेमुळे तेजस्वी यादव याला विजय गाठता आला नाही त्यामुळे काही पक्षातील लोक पक्षात तर राहतात मात्र विरोधी पक्षाचे काम करताना दिसून येतात. महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीने मोठे यश मिळवत सर्वात मोठा पक्ष निर्माण झाला आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण झाली, मात्र ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत याच केवळ भावनेपोटी पक्षातील असतील विरोधी पक्षातील असतील यांनी आलेलं यश हातातून घालून टाकले आणि त्या वेळेस खरं लक्षात असे आलं की, एका पक्षात असणारा निष्ठावान माणूस तो त्याच पक्षाच्या हिताचा विचार करतो का? पक्षात राहून दुसऱ्या पक्षाच्या कसं भलं होईल हे पहात असतो का? हे न कळणारे कोडं आहे असं वाटते.
मित्रपक्ष बनून महानगरपालिकेची किंवा राज्याची निवडणूक लढवत असतानासुद्धा आपल्या पक्षाच्या जागा यावे म्हणून की आपल्या विरोधकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून किती जागा उभ्या कराव्यात, कोणाच्या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवार उभे करावे व कोणत्या जागा सोडाव्यात अशी वेगवेगळी गणित मांडून पक्षात राहून पक्षाचा पराभव कसा होईल आणि समोर दिसणारा विरोधक मात्र आडपडदा ठेऊन त्याला मदत कशी होईल असं काही चित्र आज कालच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. आघाडी करायची आणि या सगळ्या आघाड्या करत असताना कोणाच्या सत्तेचा घास तोंडापाशी आलेला हिरावून घ्यायचा तो हिरावून घेण्याचा मोबदलाही वसूल करायचा असे काही न पटणारे, न दिसणारे राजकीय डावपेच पाहायला मिळत असतात.
कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या बद्दल अविश्वास निर्माण व्हावा शंका निर्माण व्हावी यासाठी माझे हे लेखन नसून माझं एक निरीक्षण आहे असे आपण समजावे, ही विनंती. मात्र आयुष्यभर आपल्यात तरुणाईची कुर्बानी देऊन नेत्यासाठी आणि पक्षासाठी निष्ठावान बनून राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांचं यातून नुकसान होतं हे नुकसान होऊ नये त्यांच्या कामाची दखल घ्यावी आणि त्यांचा सन्मान व्हावा यासाठीच आहे माझं चिंतन आहे असे समजावे.हे पक्षाच्या पातळीवरचं झालं मात्र अनेक अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत ते ज्या मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व मिळवतात त्याच काम असतेही त्याच बरोबर विरोधी पक्षातून कोणाला उमेदवारी दिल तर या समोरच्या उमेदवाराचा तो पराभव करु शकत नाही हे ओळखून खरा दावेदार असणाऱ्या उमेदवाराचे तिकीट विरोधी पक्षातील मिंत्राकडून कापणे किंवा तुलनात्मक दृष्ट्या कमजोर असणारा उमेदवार उभा करणे, बंडखोरी करणं आणि जातीय समीकरणे पाहून मत विभाजनासाठी उमेदवार उभे करणं अशा पद्धतीचा व रणनितीचा उपयोग आपल्याला दिसून येतो. मुंबई
- प्रांताचा विचार करत असताना काही मतदार संघातील विजय व पराभव वरील संदर्भ स्पष्ट करता येतील.
- # नवाब मलिकांचा विजय व तुकाराम कातेंचा पराभव.
- # आशिष शेलार यांचा दुसरी टर्म व मुस्लिम बहुल एरियामध्ये बाबा सिद्दिकी यांनी स्वतःच्या मुलाला शेजारच्या मतदारसंघात ( स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थान असणाऱ्या खेरवाडी मतदारसंघात )
- # जियान सिद्दिकी भाजपा शिवसेना युती असताना व बाळा सावंत या निष्ठावान शिवसैनिकाच्या पत्नीला आमदार तृप्ती सावंत या अपक्ष उमेदवाराचा पराभव करून व शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा मातोश्री च्या दारात पराभव.
- # आदित्य ठाकरे यांचा आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात विजय सुरेश माने यांची उमेदवारी विद्यमान आमदार संजय शिंदे सचिन आहेर यांचा शिवसेनेत प्रवेश.
- # शिवसेनेचे फादरपेकर यांचा सलग दोन वेळा विजय व आंबेडकरी चळवळीचा दुसऱ्या फळीतील चेहरा चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव व व्यवसायिक असणाऱ्या माहुलकरांना उमेदवारी
- # सुनील प्रभू दिंडोशी मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचे नंतर भाजपामय झालेले राजहंस सिंग आणि भाजपाचे युवा नेते मनोज कुंभोज यांचा पराभव.
अशी अनेक उदाहरणं सांगता येतील ही झाली मुंबईतील अशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुणाच्या विजयाची व कुणाच्या पराभवाची उदाहरण आपल्याला दिसून येतील. राजकारणात अशा अनेक गोष्टी दिसून येतात, उदा. माणूस मुंबईत आला मराठी माणूस मुंबईत शिवसैनिक व गावाला गेला की तो पश्चिम महाराष्ट्रातील असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा. तसेच विदर्भामधील शिवसेना नेते मुंबईत आले की शिवसेनेचे नेते आणि विदर्भात असतील तर ते गडकरी साहेबांचे सहकारी व विकासाची काम करण्यासाठी आम्ही गडकरी साहेबांसोबत. शिवसेना बीजेपी मध्ये असणारे मागासवर्गीय नेते खास करून राखीव जागांवर निवडून येणारे त्या संबंधित पक्षाच्या कार्यालयात व त्यांच्या नेतृत्वासमोर हातात गंडेदोरे व पक्षीय अभिनिवेश करून पक्षाचे निष्ठावान आणि आपल्या आंबेडकरी वस्त्यांमध्ये गेल्यानंतर धम्म परिषदांमध्ये व मतदानाच्या वेळेस आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होतात.
मात्र आज असंख्य आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान रिपब्लिकन कार्यकर्ते व नेते आंबेडकरी पक्षातही निष्ठावान व रिपब्लिकन पक्षातही आंबेडकरवादी असतात ते समाजात सत्ता असो की नसो निष्ठेने काम करतात त्यांचा सार्थ अभिमान आणि त्यांचा सन्मान समाजामध्ये होत असतो, हेही आपण पाहिलेले आहे. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे केवळ फायद्यासाठी व हितसंबंधांसाठी राजकारण करणाऱ्या लोकांना व पक्षांना आपण ओळखलं पाहिजे आणि कथनी आणि करणी मध्ये एक वाक्यता असणाऱ्या नेत्यांच्या सोबत आणि पक्षा सोबत आजच्या बदलत्या राजकीय प्रक्रिये सोबत राहणे गरजेचे आहे. .
प्रविण मोरे : खारघर
प्रवक्ते- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
0 टिप्पण्या