कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

 


ठाणे
अनुसूचित  जाती/ शेतक-यांच्या  उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही सिंचनप्रधान योजना कृषि विभाग , जिल्हा परिषद ठाणे या विभागामार्फत  राबविण्यात येते. सन २०२०-२१ या वर्षाकरिता  सदर योजनांर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सदर करण्यासाठी राज्यशासनामार्फत महाडीबीटी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. इच्छुक शेतक-यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा. सन २०२०-२१ अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जांचा विचार सन २०२१-२२ करिताही  होणार असल्याने जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी  योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजनांर्गत पुढील  बाबी अंतर्भूत असून त्यांची उच्चतम अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

नवीन विहीर-२,५०,०००/-, जुनी विही र दुरुस्ती-५०,०००/-, ईनवेल बोअरिंग-२०,०००/- पंपसंच-२०,०००/- वीज जोडणी आकार-१०,०००/- शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण-१,००,०००/-, सूक्ष्म सिंचन संच अ) तुषार संच- २५,०००/-                            ब) ठिबक संच-५०,०००/- सदर योजनेंतर्गत वरील बाबींचा समावेश असला तरी सदर योजनेचा लाभ पॅकेज स्वरुपात देय आहे असे एकूण तीन पॅकेज असून पैकी एका पॅकेजचा लाभ देय राहील.नवीन विहीर पॅकेज -सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, या  बाबींचा लाभ देय आहे. शेतक-याने ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या  आवश्यक त्या  बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र  यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून लाभार्थ्याने नवीन विहीर या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.जुनी विहीर दुरुस्ती – सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म  सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, या बाबींचा लाभ देय आहे. शेतक-याने ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या  आवश्यक त्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थींने विहीर घटकाचा लाभ घेतलेला नसावा.शेततळयाचे अस्तरीकरण - सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी  आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच या बाबींचा लाभ देय आहे. शेतक-याने ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या आवश्यक त्या  बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून अशा लाभार्थीने नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती अशा घटकाचा लाभ घेतलेला नसावा.ज्या शेतक-यांनी यापूर्वीच शासकिय योजनेतून विहीर घेतली असेल अथवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा  शेतक-यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार) पंपसंच यासाठी अनुदान देय राहील. अर्जदार      शेतक-याने ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे.या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष

लाभार्थी हा सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असलेला अनुसूचित जाती/  शेतकरी असला पाहिजे.नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी शेतक-याकडे त्यांच्या  स्वत:च्या नांवे किमान ०.४० हेक्टर जमीन असावी . नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान  ०.२० हेक्टर क्षेत्र जमीन असणे आवश्यक आहे. सदर योजनेंतर्गत कमाल शेतजमीनीची अट ६.०० हेक्टर आहे.शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगरपालिका व महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील)लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.लाभार्थ्यांकडे स्वत:चे नांवे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी  संलग्न असणे आवश्यक आहे.अनु.जाती /नवबौघ्द शेतक-याला  सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. १५००००/-च्या मर्यादेत असावे. अशा      शेतक-यांनी संबधीत तहसिलदार यांचेकडून सन २०१९-२० चे उत्पन्नाचा अद्ययावत  दाखला  अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. लाभार्थीस योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

 इच्छुक शेतकरी बांधवांनी यासाठी राज्य शासनामार्फत महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या  संकेतस्थळावरील “शेतकरी योजना”  हा पर्याय निवडावा. वैयक्तीक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधारक्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करुन घ्यावा लागेल. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवाकेंद्राची मदत घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपले संबधीत पंचायत समिती मधील कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी (कृषि) यांचेशी संपर्क साधावा. जिल्हयातील जास्तीत जास्त अनुसूचित जाती ,   शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  संजय निमसे, सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद ठाणे तसेच  अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA