नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये 125 व्या जयंती साजरी करण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या वतीने समता प्रतिष्टान नागपूर यांना बार्टीमार्फत १६ कोटी देण्यात आले. मात्र संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय हा खर्च करण्यात आला. चुकीचा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवणे, निविदा न काढता काम देणे, तसेच प्रतिष्ठानमध्ये तीन वर्षांच्या काळात 16 कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याबाबत शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. कोणत्याही अधिकृत पावती शिवाय हा खर्च झाल्याने अफरातफर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक लेखा परीक्षणाचा अहवाल आला आहे. यात कॅगचे काही लोक आहेत. 3 कोटी 67 लाख रुपयांचा प्रथमदर्शनी गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. संस्थेमध्ये अजून 14 कोटी रुपयांचा घोटाळा पुढे येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेमधील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत केली. असे सभागृहात धनंजय मुंडे म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही असे स्पष्टपणे सांगितले. या संस्थेच्या व्यवहाराच्या किमान 400 फायली आहेत. प्रत्येक फाईल तपासण्यात वेळ लागेल. तरीही 3 कोटी 67 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिकदृष्टया दिसून येते. तरीही कॅगचा (महालेखापाल) अहवाल आला नसल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात कॅगच्या चौकशीत ज्या मुद्दय़ावर अधिकची माहिती मागितली ती देण्यात आल्याचे आणि कॅगचे समाधान झाल्याचे सांगितले. मात्र प्राथमिक चौकशीत ज्या गोष्टी पुढे आल्या आहेत त्यामध्ये कॅगचा अहवाल समोर आलेला नाही असे मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
या कालावधीत राज्यात फडणवीस पुरस्कृत भाजपचे राज्य होते. ज्यामध्ये समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले होते. त्यांच्या मार्फत नागपूरचे आमदार त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि नागपुरचे खासदार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या अनेकांचा यात हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राजकुमार बडोले हे एकटे एव्हडा मोठा भ्रष्टाचार करू शकत नाहीत..मागासवर्गीय मंत्री म्हणून राजकुमार बडोले यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हा भ्रष्टाचार भाजपच्याच वतीने झाला असल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
तुम्ही नावे जाहीर करा सायंकाळी पाच वाजे पर्यंत त्यांना निलंबित करा असे मुनगंटीवार म्हणताच....(मुनगंटीवार यांनी वरिष्ठ नेते यांना वाचवण्यासाठी वक्तव्य होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प होते) समता प्रतिष्टान वर असलेले शीला चहांदे, कुमारी सोनाली बडोले, उमेश संगोडे, उमेश नांदेश्वर हे यात दोषी आहेत. त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात येणार.असे धनंजय मुंडे समाज कल्याण मंत्री यांनी जाहीर केले. मात्र STI नेमून कारवाई करण्यात येईल. अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जाईल. इतकेच नव्हे तर संपूर्ण खापर बडोले यांच्यावर फोडले जाईल आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपवून त्यांना बदनाम करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी केला आहे.
आज पर्यंत ऐकले होते कार्यकर्ते आंबेडकर जयंतीच्या पैश्याचा गैर वापर करतात.पण आपला मंत्री आणि भाजपा सत्ताधारी हे पण जयंतीचे पैसे खातात, हे आज सभागृहात समोर आले.या लोकांना नागपूर आणि महाराष्ट्राच्या दलित जनतेने जाब विचारला पाहिजे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि जनतेला बदनाम करण्याचा डाव हा भापचा नक्की असणार? या विषयावर आंदोलन झाले पाहिजे आणि भाजपाला नागडे केले पाहिजे. आता माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी लोकांना सत्य सांगितले पाहिजे. - पत्रकार बाबा रामटेके
------------------
६ डिसेंबर २०२० करिता महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमांकरिता जी/उत्तर विभागकरिता एकुण रू.३,२७,५५,०००/- इतके बजेट मंजुर करण्यात आलेले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान व चैत्यभूमी येथे १. चैत्यभूमी वास्तुची तसेच अशोक स्तंभ व तोरणा गेटची साफ सफाई व रंगरंगोटी करणे. २. चैत्यभूमी व अशोक स्तंभाची फुलांनी सजावट करणे ३. भीमज्योतीची फुलांनी सजावट करणे ४. चैत्यभूमी येथे महत्वाच्या व्यक्तींकरीता नियंत्रण कक्ष. ५. चैत्यभूमी व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे व किटकनाशक औषधांची फवारणी करणे. ६. चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करणे. ७. चैत्यभूमी येथे १ अग्निशामन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका व ४ बोटी + जल सुरक्षा रक्षक तैनात ठेवणे इत्यादी कामांकरिता करण्यात आलेल्या एकुण खर्चाची माहिती या विभागाच्या अभिलेखावर उपलब्ध आहे.
0 टिप्पण्या