Top Post Ad

असह्य होतोय महागाईचा मार...

 


केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मागील दोन महिन्यापासून घरगुती सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे आज हे  दर 819 रुपयांवर गेले आहेत. इतकेच नव्हे तर पेट्रोलचे दर 98, डिझेलचे 89 झाले आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर जास्त होते. त्यावेळी म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, आता क्रूड ऑईलचे दर आवाक्यात असतानाही इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या कार्यालयासमोरच बॅनर झळकवले आहेत.  शिजवायचे कसे, खायचे काय, प्रवास करायचा कसा? असे प्रश्न उपस्थित करीत“ जबाब दो” असे म्हणत  पंतप्रधान मोदी यांनी आता उत्तर द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.  इंधन महागले, प्रवास करणार कसे? अन्नधान्य महागले, विकत घेणार काय? सिलिंडर महागले, अन्न शिजवणार कसे? असे प्रश्न विचारणारा फलक भाजप कार्यालयासमोरच लावून असह्य होतेय महागाईची मार- पळवून लावू मोदी सरकार असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे

प्रधानमंत्री केवळ आपल्या मन की बात ऐकवण्यात मग्न आहेत. त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न ऐकण्यात स्वारस्य नाही. त्यांनी आता जनतेची ‘मन की बात’ ऐकावी, यासाठी हे बॅनर लावले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले.  2013-2014 मध्ये सरासरी 110 डॉलर्स प्रती बॅरल असे क्रूड ऑईलचे दर असतानाही तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय जनतेला 70 ते 72 रुपयात पेट्रोल आणि 50 ते 52 रुपयांत डिझेलचे वितरण केले होते. आता सरासरी 64 डॉलर्स प्रती बॅरल असा क्रूड ऑईलचा दर असतानाही पेट्रोल 97 रुपये 87 पैसे तर डिझेल 88.58 रुपये दराने वितरीत केले जात आहे. घरगुती सिलिंडरचे दर 819 रुपयांवर गेले आहेत. अशा स्थितीमध्ये अन्न शिजवायचे कसे? डाळींचे दर 100 रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच आता खायचे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत  ‘बहुत हुई महँगाई की मार , अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या मोदींना जनतेकडूनच “ बहुत हुई महँगाई की मार, अब भगाओ मोदी सरकार’ असा टोला लगावला जात आहे, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com