Top Post Ad

अवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा येथे आढळला या  प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत करण्याची भाजपने केलेली मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावली.  हा तपास मुबई पोलिसांची 'एटीएस'च करेल असे स्पष्ट केले आहे. मात्र नाना पटोले यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत करण्याची विरोधी पक्षाची मागणी उचलून धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  केंद्रीय तपास संस्थांकडे हा तपास देण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही. त्यांना तो अधिकार आहे. संशयास्पद भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास त्यांनी परस्पर आपल्या ताब्यात घेतलाच आहे. तसाच मनसुख हिरानी मृत्यू प्रकरणाचाही योग्य तपास एनआयएने आपल्या ताब्यात घ्यावा. असे पटोले यांनी म्हटल्यामुळे आपल्याच आघाडीतील गृहमंत्र्यावर अविश्वास दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

त्यातच मागील काही गोष्टीवरून नाना असे बोलले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एक जानेवारी 2021 ला अनिल देशमुख पुण्यात पत्रकार परिषदेत संभाजी भिडे विरोधात आरोप पत्र दाखल करणार असे जाहीर करतात व अवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट देतात कश्यासाठी ? औरंगाबाद बलात्कार गुन्हा दाखल होऊन चारमाहीने उलटले आरोपी मेहबूब शेख जो राष्ट्रवादीचा युथ प्रदेश अध्यक्ष आहे अद्याप अटक नाही  अहमदनगर येथील महिला समाजसेविका रेखा जारे खुनाचा मुख्य आरोपी बाळा बोठे चार महिने झाले अद्याप फरार आहे पोलिसांच्या हाती लागत नाही.

जळगाव पोलिसांना क्लीन चिट प्रदान सरकारी आश्रमातील मुलींचा नग्न डान्स क्लिप व्हायरल झाली गृह मंत्रि म्हणतात गरबा डान्स करताना गरम झाल्या मुळे मुलीने कपडे काढले. पूजा चौव्हाण आत्महत्या घातपात गर्भपात प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही महत्वाचा दुवा अरुण राठोड विलास चौव्हाण यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. वनमंत्री संजय राठोड पंधरा दिवस बेपत्ता परंतु पोलिसांना थांग पत्ता लागत नाही पूजाचा गर्भपात करणारा यवतमाळचा डॉक्टर हाती लागत नाही . रेणू शर्मा हिने समाज कल्याण मंत्रि धनंजय मुंढे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आठ दिवसा नंतर तिने गुन्हा मागे घेतला पोलीस कारवाई थांबविली. दरम्यान रेणू शर्मा हिच्या विरोधात ब्लॅक मेलिंग संबंधात कृष्णा हेगडे या माजी आमदाराने डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तिचाही तपास थांबवला गेला कश्यासाठी. सुशांत राजपूत प्रकरणात प्रिया चक्रवर्ती हिची पाठराखण करण्याची काय आवश्यकता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही विद्यमान गृहमंत्र्यांनी बासनात गुंडाळली आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com