पुढील आठ दिवसात एमपीएससी परिक्षेची तारीख जाहीर करू - मुख्यमंत्री

एमपीएससीची परिक्षा नियोजित परिक्षा १४ मार्चला होणार होती. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हि परिक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससी आयोगाने घेत तशी माहिती आज सर्व विद्यार्थ्यांना कळविली. मात्र विद्यार्थ्यांनी पाचव्यांदा परिक्षा पुढे ढकलल्याने आंदोलनाची भूमिका स्विकारत दिवसभर आंदोलन करण्यास सुरुवात केली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ व्यांदा एमपीएससी परिक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिवसभर केलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने दखल घेत या परिक्षेची नवी तारीख उद्या जाहिर करण्यात येणार असून हि तारीख ८ दिवसातील असणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना आज रात्री दिले. ठिद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

 सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिक्षेसाठी लागणारा सर्व कर्मचारी वर्ग कोरोनाच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. परंतु पुढील आठ दिवसात परिक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच परिक्षेला उशीर होत असल्याने वय उलटून जाण्याची भीती वाटत असेल तर त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण परिक्षेला ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले आहेत. त्या सर्वांना परिक्षा देता येणार असून या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाची वयाची अट राहणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वीही त्यावर औषध नाही ना आजही नाही. जगातील अनेक देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. महिना दोन महिने झाले तरी तेथील लॉकडाऊन उठविण्यात आलेला नाही. महाराष्ट्रहही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे पण मला राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची बिलकूल इच्छा नाही. परंतु नागरिकांनी त्रिसुत्री वापरावी आणि कोरोनाची चाचणी सर्वांनी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्याच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांची परिक्षा १४ मार्चलाच घ्यावी अशी मागणी करत आपले आंदोलन असेच पुढे सुरु राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

एमपीएससीची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलणे ही सरकारी हुकूमशाही आहे, त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये असंतोष असल्याने राज्यभर विध्यार्थी रस्त्यावर आले आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.युवकांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होत आहे.सलग पाच वेळ परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कोरोना काळात इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. आरोग्य विभागाच्या परिक्षा अत्यंत गोंधळात आणि अनागोंदी ने गाजत असताना ह्या संशयास्पद परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची घाई सरकार करत आहे. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे ?एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा आधी तीन दिवस आधी जाहीर करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्य सोबत खेळण्याचा गंभीर गुन्हा आहे.  सरकारने तातडीने हा तिढा निकाली काढावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या