Top Post Ad

चिकित्सा आणि शंका या दोन शास्त्रांच्या आधारे भंकस विज्ञान खोडून काढू


विज्ञान हे ज्या खांबांवर उभे असते ते खांब फार महत्त्वाचे असतात. पहिला खांब म्हणजे तटस्थतेने निरीक्षण करणे. थोडक्यात कुठल्यातरी धार्मिक किंवा पवित्र ग्रंथांनी सांगितले आहे किंवा धर्मगुरू किंवा बुवा महाराजांनी सांगितले आहे म्हणून ते खरे ठरत नाही. तर तटस्थपणे प्रयोग करून निरीक्षण करणे महत्त्वाचे असते. तटस्थ प्रयोग याचा अर्थ तो या बाजूचा नाही, तो त्या बाजूचा नाही आणि कोणत्याच बाजूचा नाही. निरीक्षण करून मगच नंतर तो निर्णय घेणार असतो. हे प्रयोग सुद्धा अनेक नियमांनी बद्ध असतात. नियम म्हणजे माहिती गोळा करणे, त्याचे निरीक्षण करणे मग त्यावर प्रयोग करणे आणि जो निष्कर्ष येईल तो पुन्हा पुन्हा तपासून पाहणे. हे जे पुन्हापुन्हा तपासणे असते ते ज्या पद्धतीने प्रयोग केला त्या प्रयोगानेच असते. एकदा खात्री झाली की याच प्रयोगाने हाच निष्कर्ष मिळतो आहे मग तो निष्कर्ष अंतिम ठरवला जातो. जर तो निष्कर्ष कोणी खोडून दाखविला तर तो स्वीकारला जातो. कोणतीही गोष्ट तपासून मगच स्विकारायची हा विज्ञानाचा खाक्या असतो. इथे भक्ती आणि भोळेपणा चालत नाही. सतत सतर्क राहून निष्कर्ष चुकीचे येणार नाहीयेत ना हे तपासले जाते. विज्ञान म्हणजे कुणी अतिंद्रिय शक्तीवाली व्यक्ती नव्हे, अतिम ग्रंथ नव्हे.

भंकस विज्ञान कुठल्यातरी ग्रंथातून सांगितले म्हणून गळी उतरवले जाते. कोणीतरी देवाने, महाराजाने, गुरूने, ऋषीने, मुल्लाने, फादरने सांगितले आहे म्हणून ते खरे आहे असे भंकस विज्ञान म्हणते. उदाहरणार्थ, आमच्या ग्रंथात विमाने होती. विज्ञान हे विमान कसे तयार होते त्यासाठी कोण कोणते विज्ञानाचे विभाग काम करतात, त्याची सूत्रे कोणती असतात, आणि प्रत्यक्ष ते कार्य कसे करते हे सर्व पुराव्यासहित सादर करते. भंकस विज्ञानाकडे फक्त पवित्र ग्रंथ किंवा गुरु एवढाच पुरावा असतो. भूतकाळातल्या कोणत्याही गोष्टीविषयी विज्ञान पुरावा मागते. त्याचे संपूर्ण तपशील प्रयोगासहित मांडा असे सांगते. जे भंकस विज्ञानाला कधीच जमत नाही. उदाहरणार्थ, उत्क्रांती ही फक्त डार्विनच्या ग्रंथात नाही. डार्विनने उत्क्रांतीचे तत्त्व मांडले. पण त्याच्याही पुढे जाऊन विज्ञान हे भ्रूणविज्ञान, अश्म विज्ञान, जनुक विज्ञान, जैव भूगोल विज्ञान, सूक्ष्म कण विज्ञान, अशा सर्व विज्ञानाच्या शाखांच्या आधारे उत्क्रांती सिद्ध करून दाखवते. विज्ञानात एखादा शोध लागला की भंकस विज्ञान पुढे सरसावते. आणि सांगू लागते की हा शोध आमच्या पवित्र ग्रंथात पूर्वीच सांगितला आहे. याचा अर्थ शोध लागल्यानंतर त्यांना ग्रंथात आहे असा साक्षात्कार होतो !! तोपर्यंत ते चिडीचुप असतात. थोडक्यात ही बनवाबनवी असते.

या पृथ्वीचा शोध देवाने लावला आहे व आपण सारे देवाची लेकरे आहोत आहोत हे धर्मग्रंथात लिहिले म्हणून सत्य मानणे विज्ञान नाकारते. कारण या म्हणण्याला पुरावा कोणताच नाही. याउलट विज्ञान डेटिंग सिस्टीम या तंत्राच्या आधारे सौरमाला ही साडे चार अब्ज वर्षांपूर्वी व अवकाश साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आले असेच सांगते. कोणताही धार्मिक ग्रंथ सात-आठ हजार वर्षापूर्वी काय घडले, काय काय होते, हे काहीही सांगत नाही. पुरावा तर लांबची गोष्ट. विनोदाची गोष्ट ही आहे की धर्म ग्रंथ किती वर्षांपूर्वीचे आहेत हेही विज्ञानाने शोधून काढले आहे !!!

भंकस विज्ञानाची तपासणी करण्यासाठी काही प्रयोगही केले जातात. पण त्याचे निष्कर्ष मात्र एक तर चुकीच्या पद्धतीने जाहीर केले जातात किंवा सरळ सरळ समोरचा फसेल अशा पद्धतीने मांडले जातात. त्यामुळे भंकस विज्ञान प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे असा ढोल बडवला जातो.अनेक वेळा भंकस विज्ञानाचा पुरावा म्हणून "परंपरा असे म्हणते म्हणून हा पुरावा आहे" असे सांगितले जाते. काहीवेळा एखाद-दुसऱ्या ला अनुभव आला की तो सर्वांना तसाच येईल असे सांगून भंकस विज्ञानाचा प्रचार केला जातो.अनेक भंकस विज्ञानामध्ये पारलौकिक गोष्टी मांडून तोच पुरावा आहे असे सांगितले जाते. उदाहरणार्थ, ॲक्युपंक्चर, रेकी. काहीजण तर भंकस विज्ञानाचे समर्थन करताना भंकस विज्ञान हे दैवी शक्ती मुळे सिद्ध होते असे विनोदी बोलतात.हे भंकस विज्ञान गेली दहा वर्षे पसरविण्याचे कार्य केंद्रातील सरकार अव्याहतपणे करत आली आहे. खरं तर हा विज्ञानावर चढवलेला हल्ला होय. 

विज्ञानावर शंका उपस्थित करून आमचेच विज्ञान सर्वश्रेष्ठ होय असे ठसवून आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे महान कार्य या सरकारने चालविले आहे. राष्ट्रवाद हा विज्ञानाला बदनाम करून लोकांमध्ये रुजवला तर हा देश हजारो वर्षे मागे जाऊन पुन्हा त्या प्राचीन गुहेत जाऊन राहील यात शंका नाही. विज्ञान हे कितीही नष्ट करायचा प्रयत्न केले तरी ते नष्ट होणार नाही. कारण आताच्या युगात मानवाला मिळालेल्या व उपभोगीत असलेल्या सर्व सुविधा विज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत, कोणत्याही देवाने, परंपरेने किंवा धर्माने नाही. इथेच हे सरकार थांबलेले नाही या सरकारने ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेमार्फत भारतीय परंपरा, भारतीय विज्ञान, वगैरे "भारतीय" अशा नावाखाली भंकस विज्ञानाला भारतीय विज्ञान असे म्हणत एक पुस्तिका काढली असून ती सर्व उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक महाविद्यालयातून वाटप केली जाणार आहे. 

पण जगभरात उच्छाद मांडलाय एका वेगळ्याच विज्ञानाने. ज्याला म्हणतात भंकस विज्ञान ! स्युडोसायन्स.
भंकस विज्ञान म्हणजे कोणीतरी उठतं आणि त्यात कोणतेही विज्ञान नसताना ते विज्ञान आहे असं ठासून सांगतं.

माणसाला हत्तीचे मुंडके बसवणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी हे भंकस सायन्स आहे.पुराणात विमाने होती म्हणजे राइट बंधूंनी शोध लावायच्या अगोदरच भारतात विमाने होती असे म्हणणे म्हणजे भंकस सायन्स आहे.वैदिक ज्योतिष शास्त्र हे सायन्स आहे असे म्हणणे म्हणजे भंकस विज्ञान होय.
गोमुत्राने सर्व रोग बरे होतात आणि आपण निरोगी राहतो असे सांगणे म्हणजे भंकस विज्ञान आहे.
गायीच्या शेणाने जमीन सारवली की कोणतेही विषारी प्रारणे व सौर किरणे यांना प्रतिबंध होतो हे भंकस विज्ञान आहे.
कोरोनील गोळ्यांनी कोविड रोग बरा होतो हे भंकस विज्ञान आहे.
गाईच्या शेणाच्या गोवऱ्यानि कॅन्सर बरा होतो हे भंकस विज्ञान आहे.
गायीचे मुत्र हे जंतूनाशक आहे हे भंकस विज्ञान आहे.
महाभारताच्या काळात अण्वस्त्रे होती हे भंकस विज्ञान आहे.
तूप घालून होम-हवन केल्यास पाऊस पडतो हे भंकस विज्ञान आहे.
ब्रम्हाने डायनासोर चा शोध लावला हे भंकस विज्ञान आहे.
महाभारतातला संजय म्हणजे इंटरनेट आणि अवकाश तंत्रज्ञान त्याकाळी होते असे म्हणणे म्हणजे भंकस विज्ञान आहे.
वैदिक सिद्धांत हा सापेक्षतावादाच्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगणे म्हणजे भंकस विज्ञान आहे.
डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खोटा आहे असे पुरावा न देता सांगणे म्हणजे भंकस विज्ञान आहे.
मोर आयुष्यभर ब्रह्मचारी असतो आणि लांडोर मोराचे अश्रु पिऊन गर्भवती होते असे सांगणे म्हणजे भंकस विज्ञान आहे.
यज्ञाने प्रदूषण कमी होते हे भंकस विज्ञान आहे.
गोमूत्रात सोने असते असे म्हणणारे भंकस शास्त्री आहेत.
ज्योतिषशास्त्रासमोर विज्ञान हे अपरिपक्व आहे असे म्हणणे म्हणजे भंकस विज्ञान होय.
गोमुत्रामुळे कोरोनाव्हायरस मरतो हे भंकस विज्ञान होय.

विज्ञान हे सर्व पाहते आहे.
चिकित्सा आणि शंका या दोन शास्त्रांच्या आधारे ते सहजपणे भंकस विज्ञानास खोडून काढू काढते पण हे इथल्या सोंगाड्या राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येत नाही.

भक्ती ही विज्ञानात येत नाही पण फक्त गोमुत्र आणि शेणाच्या गोवऱ्या हेच भारतीय सायन्स आहे असे सांगत फिरण्यात भक्त मात्र मग्न आहेत !!!
विज्ञान विरूद्ध भंकस विज्ञान अशी खरी लढाई आहे. आपण विज्ञानाचा अंगिकार करू या. 

– डाॅ. प्रदीप पाटील
(मनोविकार तज्ञ, सांगली) यांच्या फेसबुक वरून साभार...

----------------------------------------------------------------


शनिवारी नख कापल्याने शनी पाठी लागतो असा समज असणाऱ्यालाही.. विज्ञान दिनाच्या शुभेच्छा..

 'ढगांच्या' आडून 'रडार'ला 'विमान' दिसत नाही, असा 'दिव्य' शोध लावणाऱ्या आणि 'गटारगॅस'वर 'चहा' बनवून विकणाऱ्या 'चु....ला'सुद्धा; 'विज्ञान' दिनाच्या 'पातेलं'भरून शुभेच्छा!

विज्ञानाने परिपूर्ण असलेल्या राफेल विमानाच्या टायरखाली लिंबू ठेवणाऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिहांना ही विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आजारी देवांना तपासणारे डॉक्टर आणि मंगळयान पाठवताना यज्ञ करणारे शास्त्रज्ञ यांनाही विज्ञान दिनाच्या सदिच्छा.

11 ते 101 रुपयात ग्रहांची दिशा बदलण्याचा पराक्रम करणारी माणसे आहेत ती फक्त आमच्याच देशात…!

 Insurance न करता 10 लाखाच्या गाडीला 10 रू ची लिंबू-मिरची लाऊन सुरक्षा करनार्यांना सुद्धा

विज्ञानदिनाच्याशुभेच्छा

ज्यांना वाटत नवसाने आणि बाब बुवाच्या आश्रमात गेल्याने मुलं होतात त्यांना ही   विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

न्युज-चॅनल वर भविष्य सांगणाऱ्यांना सुद्धा  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

भुतासोबत कुस्ती खेळलेल्या गावच्या सर्व म्हातार्‍यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

रविवारी मटन खाऊन सोमवार-शनिवार उपवास करनार्यांना सुद्धा विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

हाताला रंगीबेरंगी धागे-दोरे-गंडे बांधणाऱ्या मर्दांना...विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

 घरात कंप्युटर/ नवीन गाडी आणल्यावरती हळदीकुंकवाचे पाच ठिपके  लिंबूमिर्ची बांधून नारळ फोडणारे खरे वैज्ञानिक. त्यांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

सम तीथीला मुलगा विषम तीथिला मुलगी होते असे सांगणाऱ्या हभप इंदोरीकर महाराजांना ही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

 सांच्याला बारकं पोरगं लय रडतया म्हणून लिंबू मिर्ची चा उतारा तिकाटण्यावर टाकणारांना...पण विज्ञान दिसाच्या लई शुभेच्छा...!

स्वतःच्या शापाने लोकांना मारणारी व गोमूत्र पिऊन कँसर बरा होतो म्हणारी शापशूटर प्रज्ञा ठाकूर यांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

 रोज सकाळी राशी भविष्य बघून दिवसाची सुरुवात करणार्यांना ही  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

माणसाच्या स्पर्शाने माणूसच काय देव सुद्धा बाटतो आणि जनावराच्या मुत्राने शुद्ध होतो असं समजणाऱ्यां सुद्धा विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

हा मँसेज ११ लोकांना पाठवा तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल डीलीट केल्यास नुकसान होईल... अश्या मँसेज वर विश्वास ठेवणार्या मित्रांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा !

आजही शिक्षीत लोकं मांजर आडवी गेली म्हणून रस्ता बदलून जातात .... त्यांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

26 जानेवारीला सुद्धा सत्यनारायण घालणाऱ्या त्या शिक्षकांना सुद्धा विज्ञान दिनाच्या शुभेच्छा 

 नऊ रंगाच्या साड्या घालून, उपवास पकडणाऱ्या, बिन चपलीचं फिरणाऱ्या मुलींना व स्त्रियांना पण  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा 

पोरगं व्हावं म्हणून देवाला नवस करणाऱ्या पण डिलिव्हरी साठी रुग्णालयाची धाव घेणाऱ्या माय माऊलींना  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

घामाने चेहरा मसाज करुन, त्वचा गोरी तजेलिदार करणाऱ्या शेठ ला ही..विज्ञान दिनाचा शुभेच्छा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकाही आव्हानाला सामोरे न जाणाऱ्या सर्व महाराज बुवा बाबा म्हसनजोग्यांना विज्ञानदिनाच्याशुभेच्छा

 गुप्तधना साठी अडिच किलोचं मांडुळ शोधनाऱ्या ना सुद्धा  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

मासिक पाळी मध्ये स्ञी च्या हातचा स्वयंपाक खाऊ नये असे बोलणार्‍या भडव्यांना सुध्दा विज्ञान दिनाच्या  शुभेच्छा 

 संत तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून "सदेह" वैकुंठाला गेले असं सांगणारयांना अन माणनार्यांना सुद्धा  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

हे तर आमच्या शास्त्रात आधीच लिहून ठेवलंय म्हणून आपल्याच .... वरून अगरबत्ती ओवळणार्या थोर संशोधकांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा 

आंब्यापासुन पुत्र प्राप्तीचा शोध लावणाऱ्या गुर्जीलाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा 

६ दिवसात जग निर्माण करून ७ व्या दिवशी (रविवारी) देवाने विश्रांती घेतली असं भ्रम पसरवणाऱ्या सर्वांना  विज्ञान दिनाच्या सदिच्छा

परदेशातून ईलाज करून भारतात आल्यावर पहिले मंदिरात जाऊन नारळ फोडणाऱ्या सेलिब्रेटींना सुद्धा विज्ञान दिनाच्या शुभेच्छा 

 ज्योतिषांना कुंडली दाखवुन राशी जुळून लग्न करणाऱ्या उच्च सुशिक्षित लोकांना ही  विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com