Top Post Ad

मुंबई लोकलसह, प्रीमियम-मेल-एक्स्प्रेसमध्ये सीओडीनुसार वायफाय सेवा

  मुंबई
भारतीय रेल्वेचे टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याच्या धोरणात्मक निर्णयानंतर आता भारतीय रेल्वेला स्मार्ट रेल्वे बनविण्याकरिता देखील धोरणात्मक बदल करण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांकरिता मनोरंजनासाठी आता प्रवाशांना मेल-एक्सप्रेससह लोकलमध्ये वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे. मार्चअखेरीस मुंबई लोकलसह मेल-एक्स्प्रेसमध्ये 'कंटेंट ऑन डिमांड' अंतर्गत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय 'रेलटेल'ने घेतला आहे. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना मनोरंजनकाचा नवीन अनुभव घेता येणे शक्य आहे. मुंबई लोकलसह, प्रीमियम-मेल-एक्स्प्रेसमध्ये सीओडीनुसार वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. टप्याटप्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १० ते १२ लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. याचबरोबर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या प्रकारच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. मात्र ही सेवा जीओच्या माध्यमातून सुरु होणार आहे की अजून कोणाच्या अशा प्रकारचा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

 रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाणी यांचा लाभ घेता येईल. टप्याटप्याने बहुभाषक मनोरंजनाचा पर्याय देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यानी दिली. रेल्वेचा नॉन फेअर रेव्ह्युन्यू वाढवण्यासाठी कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) प्रकल्पाची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती. या प्रकल्पाची अंमलबजवणीची जबाबदारी रेलटेलकडे सोपवण्यात आली होती. रेल्वे आणि रेल्वे स्थानकात कंटेंट ऑन डिमांड सेवा देण्यासाठी रेलटेलने मार्गो कंपनीशी करार केला आहे. बहुभाषक माहिती मोफत आणि पैसे देऊन अशा दोन्ही प्रकारात सेवा उपलब्ध असेल, असेही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई लोकलसह निवडक मेल-एक्स्प्रेसमध्ये कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत मनोरंजनाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मार्च अखेरीस या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com