कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासनानंतर अरुणा प्रकल्पग्रस्थांचे आंदोलन तुर्तास स्थगित

सिंधुदुर्ग / वैभववाडी
अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार, जलसंपदा आणि पुनर्वसन विभाग तसेच गावीतील बुवा सह तिन दलालांनी प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केल्याच्या निषेधार्थ तसेच अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ सुरु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा नुकसान भरपाई द्या. या व इतर मागण्यांनसाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकल्पाच्या आंबडपाल कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर पुकारलेले आक्रोश आमरण उपोषण कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांनी दिलेल्या लेखी आश्वासना मुळे तसेच कोरोना च्या पार्शभुमी वर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केलेल्या मध्यस्थी मुळे तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहीती लढा संघर्षाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर,मुकेश कदम,आरती कांबळे,सानीका कांबळे,यांनी दिली. 

अरुणा प्रकल्पाचे नव निर्वाचीत कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन पाण्याचा विसर्ग चालु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या. पनर्वसन गावठणात ठप्प असलेली नागरी सुविधांची कामे पुर्ण करा. किंजळीचा माळ पुनर्वसन गावठण मांगवली गावठणाला जोडा, कुंभारवाडी गावठणात साईबाबा मंदिरासाठी स्वतंत्र भुखंड देऊन ताबा पावती द्या. या व इतर मागण्याच्या संदर्भात चर्चा करुन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबडपाल येथील कार्यकारी अभियंता यांच्या मुख्य कार्यालया वर आक्रोश आंदोलन आमरण उपोषण करण्याचा निर्धार अरुणा प्रकल्पग्रस्तांनी केला होता. 

दरम्यान कार्यकारी अभियंता एम. एस.कदम आंबडपाल कुडाळ यांनी अधिक्षक अभियंता दक्षिण कोकण पाठबंधारे मंडळ सिंधुदुर्ग ओरोस, यांच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आलेली असुन आपल्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार क्षेत्रीय समस्या निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुर्तास आमरण उपोषण स्थगित करावे असे लेखी पत्राद्वारे अरुणा प्रकल्पग्रस्तांना तातडीने कळवण्यात आले आहे. या लेखी आश्वासनामुळे तसेच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी  कोरोना च्या वाढत्या प्राधुभाँवामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्याच्या संदर्भात मध्यस्थी केल्यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ चे आंबडपाल येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयावर आयोजीत केलेले आक्रोश आमरण ऊपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. 

जो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्काचा लढा सुरुच राहील. असे ही लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर, मुकेश कदम,आरती कांबळे,सानीका कांबळे, यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या