... म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला


 रिहाना आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या प्रतिक्रियांवर रोष व्यक्त करून माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी  सोशल मीडिया पोस्ट केल्या. त्या सर्वांच्या पोस्ट कॉपी पेस्ट वाटण्याइतपत एकसारख्या होत्या. त्यांनी कुणाच्या दबावाखाली या पोस्ट केल्या असतील याचा आता महाराष्ट्राचे गुप्तचर विभाग तपास करणार आहे. पण, या चौकशीतून काय साध्य होणार किंवा दोषी आढळल्यास सेलिब्रिटींवर कोणत्या स्वरुपाची कारवाई होणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र  काँग्रेस नेत्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी त्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. 

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी देशभर त्यातही प्रामुख्याने दिल्ली सीमांवर आंदोलन सुरू केले. त्याच आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने सोशल मीडियावरून समर्थन दर्शवले होते. आपण यावर चर्चा करत नाही असा सवाल तिने केला होता. तिच्यासोबतच, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने सुद्धा भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सुद्धा तिचे समर्थन केले. पण, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील आंदोलनांवर प्रतिक्रिया देणे म्हणजे त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणे असल्याचे मत अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केले. जवळ जवळ अनेक सेलिब्रेटिंची प्रतिक्रिया एकसारखीच असल्याने याबाबत संशय निर्माण झाला आहे. 

 दरम्यान याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. लोकशाहीच्या गप्पा पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA