कळव्यातील विस्थपितांना मिळणार मालकी हक्काची घरे

ठाणे

 दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी कळवा येथे स्टेशन ते टीएमटी परीवहन नविन रस्ता प्रकल्प करताना सुमारे ८५ लोकांना ठाण्यात खोपट येथिल मँजेस्टीक रेंटल च्या हाऊसिंग मध्ये स्थलांतरीत केले होते. या वेळी तुम्हाला सहा महिन्यात घरे मिळतील असे मौखिक आश्वासन सबंधित राजकीय लोकांनी दिले होते. मौखिक आश्वासनावर विश्वास ठेवुन लोकांनी आपापली घरे स्वखुशीने प्रशासनास दिली होती. दुर्दैवाने सुमारे १० जण पहिल्याच वर्षी वेग वेगळ्या आजाराने मृत्युमुखी पडले. या शिवाय लिफ्ट, पाणी, स्वच्छता यांची फार मोठी गैरसोय होती. प्रशासन मात्र मौन गिळुन बसले होते. या विस्थापितांना घरे मिळावी यसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानचे कार्यकर्ते अनुपकुमार प्रजापती हे पाठपुरावा करीत होते. विस्थापितांसाठी पाच हजार घरे उपलब्ध असल्याचे मे २०१८ मध्ये तत्कालिन अति आयुक्त सुनिल चव्हाण यांनी सांगितले होते.   

विकासक देणार घरे...ठाणे पालिकेने केली होती बोळवण
कळवा येथिल रस्तारुंदीकरणामध्ये सुमारे ८५ घरे बाधित करुन त्यांना खोपट येथिलसफायर मँजेस्टीक रेंटलच्या हाउसिंग मध्ये तात्पुरत्या स्वरुपात दिली होती. मात्र येथे सुविधांचा अभाव व अस्वच्छता याकारणामुळे पहिल्याच वर्षी सुमारे १० नागरीक मृत्यृमुखी पडले. बाधितांचे पुनर्वसन होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असताना प्रशासनाने सदर घरे विकासक हा एसआरए च्या माध्यमातुन देणार असुन त्याकरीता सदर प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले. मात्र ठाणे मतदाता जागरण अभियानचे कार्यकर्ते अनुपकुमार प्रजापती यांनी एसआरए प्राधिकरणाकडे धाव घेवुन सदर बाबतीत खुलाशा मागितला असता एसआरए प्राधिकरणाने याबाबत कोणतेही प्रस्ताव आथवा पत्र प्राप्त नसल्याचे सांगितले शिवाय पुनर्वसनाबाबत कोणतेही जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले.

विस्थापितांना अचानक भाडे आकरले
कळव्यातील विस्थापितांना खोपट येथिल मँजेस्टीक रेंटल च्या घरात स्थापित केल्यानंतर त्यांना अचानकपणे सुमारे प्रत्येकी ७० ते ८० हजार रुपयापर्यंतच्या भाडे थकबाकीच्या नोटीसा काढण्यात आल्या.
अचानकपणे भाडेच्या नोटीसा आल्यामुळे सदर विस्थापित व ठाणे मतदाता जागरण अभियानचे कार्यकर्ते श्री अनुपकुमार प्रजापती यांनी तत्कालीक महापौर सौ मिनाक्षी शिंदे यांच्याकडे धाव घेतली. व विस्थापितांना भाडेमाफीच्या ठरावाच्या अनुषंगाने या विस्थापितांना मिनाक्षीताई शिंदे यांच्यामुळे भाडेमाफी मिळाली. 

‘कोरोना’मुळे थांबले पुनर्वसन
सदर विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मंजुरी तत्कालीक आयुक्त श्री संजीव जैसवाल यांनी दिल्यानंतर दिनांक ६ मार्च २०२० रोजी मा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या हस्ते प्रतिकात्मक किल्लीचे प्रत्यार्पण कशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. मात्र या विस्थापितांना पुनर्वसनाची प्रक्रीया चालु असताना दिनांक २२ मार्च २०२० रोजी मा. पंतप्रधानानी लाँकडाऊन घोषित केल्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रीया रखडली. ‘करोना’ संक्रमणाच्या भितीने पाठपुरावाही थांबला. अखेर लाँकडाऊन शिथिल झाल्यानंतर ठाणे मतदाता जागरण अभियानचे श्री अनुपकुमार प्रजापती यांनी माजी महापौर सौ मिनाक्षीताई शिंदे यांच्या सहकार्याने विस्थापितांना घेवुन पुन्हा पाठपुरावा चालु केला असता प्रशासनाने अखेर अलाँटमेंट ची प्रक्रीया पुर्ण करुन घर वाटप करणार असल्याचे सांगीतले.
विस्थापितांच्या प्रकरणी तत्कालिक विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही मोलाची मदत केली. यासोबतच ठाण्यातील समाजिक कार्यकर्ते संजीव साने, राजीव दत्ता, महेंद्र मोने, प्रदीप ईंदुलकर, संजय मंगो, जगदीश खैरोलिया, मिलिंद महाजन, मनोज पाढी, सौ मिनाक्षी पाढी, गिरीश साळगावकर, मुख्तार भरमार, उन्मेश बागवे आदीनी मोलाचे मार्गदर्शन केले तर विस्थापितांकडुन अँड प्रमोद गाडे, सौ साक्षी माने,प्रमिला याद्व, अनघा जोशी, कल्पना शिंदे आदींनी पुढाकार घेवुन न डगमगता ही लढाई यशस्वी केली. 

बिएसयुपी च्या योजनेंतर्गत मिळणार घरे
विस्थापितांना बिएसयुपीच्या योजनेंतर्गत ही घरे उपलब्ध होणार असुन ती मालकी हक्काची असणार आहेत. सदर घराचे वाटप काशिनाथ घाणेकर येथिल नाट्यगृहात लाँटरी पद्धतीने होणार असल्याचे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या