राज्यभर ‘ओबीसी हक्क परिषदा’, भाजपचे ओबीसी जोडो अभियान

मुंबई
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधे भाजपतर्फे येणार्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दिनांक 8 आणि 9 रोजी झालेल्या दोन दिवसीय योजना बैठकीबाबत  भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील ४० हून अधिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच  राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे ‘युवा वाँरिअर’ असे नवे संघटन भाजपातर्फे उभे करण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

येणार्या काळात पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्य़ांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी नगरपरिषदा, महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणून रणनिती निश्चित कऱणे, राज्यातील ३ सत्ताधारी पक्षाविरोधात एक भाजप असा सामना झाला तरी निवडणूकांमध्ये पक्षाला मोठे यश कसे मिळेल. शतप्रतिशत भाजपाच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन व योजना या बैठकीत निश्चीत करण्यात आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून जनतेवर होत असलेला अन्याय व त्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने करावयची आंदोलने याबाबतही नियोजन या बैठकीत करण्यात आले. 

राज्यातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला नख लागले. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत त्यामुळे अशा ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यामंध्ये भाजपातर्फे येणार्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

कोकणात ग्रामपंचायत निवडणूकीत ज्यांना जनतेने नंगे केले ते आता भुतांची चर्चा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत पालकमंत्री, खासदार, आमदार भुतासारखे फिरले तरीही अपयशी ठरले तेच आज भुतांची भाषा करत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपातील अनेकांना पक्षप्रवेश देउन शिवसेना उमेदवारी देते आहे. जे स्वता:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत, ज्यांनी आत्मविश्वास गमावला आहे असे शिवसेनेचे नेतृत्व आता भाजपाकडे डोळे लावून बसले आहे. कोकणी भाषेत सांगायचे झाले तर, आमच्या ताटातील उष्टे, खरकटे खाउन पोट भरण्याचे काम सध्या सुरु आहे असा सनसनाटी टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेला पक्षप्रवेशावरुन लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या