ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेसाठी कायदा, महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन

 मुंबई :
महाराष्ट्र सरकार निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपर पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. असे मानले जात आहे की, मार्चमध्ये राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात यासंबंधीचे विधेयक मांडले जाऊ शकते. न्यूज 18 शी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला ईव्हीएमसह बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष - शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचे यावर एकमत असल्याचे मानले जात आहे.

पटोले म्हणाले, जर ड्राफ्ट तयार असेल तर विधेयक पुढील बजेट सत्रात सादर केले जाऊ शकते. मात्र, सादर केलेले बिल केवळ राज्य विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी लागू होईल. जर ठाकरे सरकारने या विचारावर पुढी कार्यवाही पार पाडली तर महाराष्ट्रात बॅलेट पेपर आणि ईव्हीएमवर एकाच वेळी निवडणुकीसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारे पहिले राज्य असेल.  अशाप्रकारच्या पावलाच्या कायदेशीर प्रभावाबाबत विचारले असता, पटोले म्हणाले, राज्यात निवडणुकी करता हा कायदा बनवण्यासाठी संविधानाच्या कलम 328 च्या अंतर्गत विधानसभेकडे अधिकार आहेत. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह याच्याशी संबंधित अनेक लोकांसोबत बैठक झाली आहे. पटोले यांनी म्हटले, कलम 328 राज्य सरकारला अशाप्रकारचा कायदा करण्याचा अधिकार देते. त्यांनी म्हटले की, निवडणूक ईव्हीएमद्वारे होणार की, बॅलेट पेपरद्वारे हा निर्णय राज्य करेल. त्यांनी म्हटले, जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात, बॅलेट पेपरवर विश्वास ठेवतात, ते यामुळे खुश होतील.

----------------------------------------

ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेसाठी कायदा करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन :
ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन

ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने,राज्यातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी राज्याला अधिकार देणारा कायदा तयार करण्याकरीत पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करण्यात आलं आहे.ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचे राष्ट्रीय निमंत्रक रवि भिलाणे,फिरोज मिठीबोरवाला,ज्योती बडेकर आणि धनंजय शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
           ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने गेली दोन वर्षे सातत्याने ईव्हीएम हटाव ही मोहीम देशभर राबविली जात आहे.लोकांचे दोस्त सारख्या जन संघटनेने ६ जून २०१८ रोजी निवडणूक आयोगाला पत्र देऊन ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देऊन ही मागणी पुढे रेटल्यानंतर त्यांनीही याबाबत अनुकूलता दर्शवली होती.आणि आता त्यांनीच पुढाकार घेऊन वरील कायदा करण्याचा सरकारचा मनसुबा जाहीर केल्यामुळे जनसंघटना आणि आंदोलनातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटलं आहे. देशातील इतर राज्यानीही अशा प्रकारचा कायदा करावा असं आवाहन फिरोज मिठीबोरवाला,ज्योती बडेकर आणि धनंजय शिंदे यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA