सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

मागील काही वर्षापासून क्रिकेट क्षेत्राकरिता कायर्रत असणाऱ्या ठाण्यातील  घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या वतीने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीराचे आयोजक श्री. विलास शिवराम सामंत श्री. चैतन्य विलास सामंत अध्यक्ष विश्वस्त आहेत.   ८ ते १४ वर्षे वयोमर्यादा असलेल्या सर्वांना या शिबीरामध्ये सशुल्क सहभाग घेता येईल.  घंटाळी मैदान, घंटाळी ठाणे या ठिकाणी प्रत्येक शनिवार व रविवार, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. 

या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०२१, रोजी सकाळी - १० वा. होणार आहे यावेळी प्रशिक्षक :श्री.. सागर जोशी । श्री. कमलाकर कोळी ।  (राज्यस्तरीय क्रिकेटपटू) - (प्रशिक्षक) प्रमुख मार्गदर्शक :- श्री. मयूर कद्रेकर (रणजीपटू) आदी उपस्थित राहणार आहेत या शिबिरात सहभागी होण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी श्री. सागर जोशी - 9022035397 सौ. नम्रता ओवळेकर - 9920781700 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या