बडोदा ते भरुच एक्सप्रेस वे चे एकाच वेळी चार जागतिक विक्रम

12 हजार टन सिमेंट काँक्रीट तयार करणे,  हे कॉंक्रिट इतक्या वेगाने अंथरणे, तसेच एक फूट जाड आणि 18.75 मीटर रुंदीचे बांधकाम आहे आणि शेवटी रिजिड पेवमेंट क्वालिटीला मेनटेन करणे अशी चार कामे अवघ्या 24 तासात करण्यात आली आणि अशा प्रकारे बडोदा ते भरुच एक्सप्रेस वेने एकाच वेळी चार जागतिक विक्रम आपल्या नावावर केले.  गुजरातमध्ये सध्या बडोदा ते भरुच एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे. मंगळवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी 2 किमी लांबीचा आणि 18.75 मीटर रुंदीचा महामार्ग केवळ 24 तासात पूर्ण करण्याचा विक्रम करण्यात आला. यासाठी 1.10 लाख सिमेंट पोते (5.5 हजार टन) आणि 500 टन बर्फाचा वापर करण्यात आला. ज्यासाठी 5 कोटी रुपये लागले. जगभरात एकाच वेळी काँक्रीट लेयर मशीन्सचा वापर 16 मीटर रुंदीचा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी केला जातो. परंतु हा एक्सप्रेस वे 18.75 मीटर रुंद आहे आणि म्हणूनच पटेल इन्फ्रास्ट्रक्चरने विशेषत: जर्मनीकडून 20 कोटी रुपयांची तीन मशीन्स खरेदी केल्या. जवळपास 1200 किलोमीटर लांब या एक्सप्रेस-वेचा गुरजातमध्ये 63 किमीचे निर्माण पटेल इन्फ्रास्ट्रक्चर द्वारे केले जात आहे.  अशा तऱ्हेने गुजरातच्या बडोदा शहराला थेट मुंबई व दिल्लीशी जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेने चार जागतिक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

या रेकॉर्डविषयी पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ​​एमडी अरविंद पटेल म्हणाले की, भारताच्या रस्ते बांधकामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. आम्ही एक असा रेकॉर्ड बनवला आहे जो त्वरीत आणि सहज मोडता येणार नाही. हे फक्त रेकॉर्ड बनवण्याबद्दल नाही तर ते आधुनिक भारताचे चित्र आहे. याने केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीही बेंचमार्क सेट केला आहे. या द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला आणखी वेग देण्यात येणार आहे, कारण आता आमच्या प्लांटमध्ये दर तासाला 840 घनमीटर सिमेंट काँक्रीट तयार करण्यात येत आहे.याविषयी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक डॉ. मनीष विश्नोई म्हणाले की, सलग 24 तास काम करणे मशीन आणि जबरदस्त नियोजन दरम्यानचा संबंध दर्शवतो. अशाप्रकारे, अभियंत्यांनी एकत्रितपणे चार जागतिक विक्रम केले. हा एक्सप्रेस वे ज्या भागामध्ये बनलेला आहे तो मुळात जमिनीपासून सुमारे 15 फूट उंचीवर आहे. या महामार्गाच्या निर्मितीमध्ये त्याच्या टिकाऊ क्षमतेची विशेष काळजी घेतली गेली आहे. यामुळे, प्रत्येक 4.5 मीटरच्या अंतराने सिमेंट काँक्रीटसह 32 मिमी (2.1 किलो) लोखंडी रॉड टाकला जात आहे. दोन्ही बाजूंच्या लांबी आणि रूंदी दरम्यान 4.5 मीटरच्या अंतराने लोखंडी रॉड टाकल्या जात आहेत.

यासाठी 1250 लोकांनी केले काम, मालवाहतुकीसाठी 115 टिपर्स ट्रक लागले. मॅकेनिकल विभागात 300 लोकांची टीम तैनात होती.  250 लोकांनी प्रोडक्शन यूनिटची जबाबदारी सांभाळली. 150,000 मीटर एचएसडीचा वापर झाला. 5,00,000 किग्रा (500 टन) बर्फाचा वापर झाला. 1,30,000 किलो डोएल बार-टीचा वापर करण्यात आला. तर 5000 टन सिमेंट सोबत 1500 टन फ्लाई ऐश मिक्स करण्यात आली 80000 किलो मिक्सरचा उपयोग करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या