व्हॉट्सअॅप बाय बाय.... सिग्नल / टेलिग्राम hi


 व्हॉट्सअॅपने लागू केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीची ६ जानेवारीला घोषणा झाल्यानंतर ४० लाखांहून अधिक मोबाइलवर सिग्नल (२४ लाख) आणि टेलिग्राम (१६ लाख) अॅप डाऊनलाेड झाले आहेत. टेलिग्रामने तर बुधवारी घोषणा केली की जगभरात त्यांचे डाऊनलोड ५० कोटींच्या वर गेले आहे. गेल्या ७२ तासांत जगभरातील अडीच कोटी युजर्सनी टेलिग्राम डाऊनलाेड केले आहे.  टेलिग्रामने भारताशी संबंधित आकडेवारी स्पष्ट केली नसली तरी कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे की, आशियात सर्वाधिक ३८% युजर्स वाढले आहेत. डाटा अॅनालिटिक्स एजन्सी सेन्सर टॉवरनुसार, व्हॉट्सअॅपच्या घोषणेनंतर पहिल्या आठवड्यात २.५ लाख सिग्नल अॅप डाऊनलोड झाले आहेत, तर ८८ लाख युजर्सनी सिग्नल साइन इन केले.

 कंपनीने स्पष्टीकरण देऊनही युजर्स वेगाने इतर प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होऊ लागले आहेत. दोन आकडेवारीतून याला पुष्टी मिळते. एक म्हणजे सेन्सर टॉवर व एपटोपियासारख्या एजन्सीनुसार, व्हॉट्सअॅपच्या डाऊनलोडमध्ये या काळात ३५% घट झाली. महिंद्रा व टाटा ग्रुपच्या चेअरमनसह वरिष्ठ अधिकारी, पेटीएम व फोन पेसारख्या कंपन्यांच्या सीईओंनी व्हॉट्सअॅपला निरोप दिला. सामान्य लोकांनीही नवे पर्याय शोधले आहेत. इंटरनेट गव्हर्नन्स एक्स्पर्ट हरीश चौधरी यांच्यानुसार, ‘अनेक छोट्या गावांतून स्मार्टफोन युजर्स टेलिग्रामवर शिफ्ट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

 रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकमधील भागीदारीनंतर मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले . फेसबुकशी झालेल्या डील नंतर अंबानींची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सने वाढून 49.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.77 लाख कोटी रुपये) झाली आहे. मुकेश अंबानीच्या जिओमध्ये फेसबुक 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीनंतर जिओमधील फेसबुकची भागीदारी 9.99% पर्यंत वाढणार आहे. तर Whatsapp ला फेसबुकशी जोडल्या गेले आहे.  फेसबुकनं 2014 मध्ये 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅपची खरेदी केली होती. सप्टेंबर 2016 पासून व्हॉट्स अॅपनं आपल्या युजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर करायला सुरूवात केली होती. आता व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसोबत आपल्या युजर्सचा डेटा शेअर करण्याचा स्पष्ट उल्लेख केला होता.

व्हॉट्सअॅपवर दोन पुस्तके लिहिणारे सायबर लॉ एक्स्पर्ट पवन दुग्गल म्हणतात, व्हॉट्सअॅप हादरले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. नव्या पॉलिसीचा कालावधीही विचारात घेण्यासारखा आहे. केंद्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात डाटा प्रोटेक्शन विधेयक आणणार आहे. यात डाटा सुरक्षेच्या कठोर तरतुदी होणार होत्या. म्हणूनच व्हॉट्सअॅपने पॉलिसी बदलली असावी. सायबर लॉ एक्स्पर्ट पवन दुग्गल म्हणतात, व्हॉट्सअॅपला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. युजर्स डाटा सेलिंग हाच कंपनीच्या कमाईचा सर्वात मोठा मार्ग आहे. युजर बेसच जर घटू लागला तर उत्पन्नावर, पर्यायाने ब्रँडवर परिणाम होईल. सध्या भारतात ४० कोटी व्हॉट्सअॅप युजर आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या