Top Post Ad

रामदासाचा शिवरायांशी संबंध नसल्याचे सिद्ध -

छत्रपती शिवरायांना रामदासाच्या पाया पडताना दाखवून छत्रपतींचा अवमान केल्या प्रकरणी अहमदनगरला दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. सामाजिक बांधिलकीतून शिवस्फूर्तीने खटला चालविणारे महाराष्ट्र गोवा-बार कौन्सिलचे सदस्य, औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव साळुके, अॅड. मयुर साळुके यांचे विविध शिवप्रेमी संस्थांनी जाहीर आभार मानले.

 समर्थ विद्या प्रसारक 1 मार्च 2008 रोजी दासनवमी निमित्त समर्थ विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर यांच्या समर्थ प्रशालेने अहमदनगर शहरातून काढलेल्या प्रचार फेरीत "छत्रपती शिवाजी महाराज रामदासांच्या पाया पडताना" अशा पद्धतीचा जिवंत देखावा सादर केला होता. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी सदर देखाव्या बाबत आक्षेप घेत कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त लक्ष्मीकांत कृष्णराव कुलकर्णी, सचीव विश्वेश यशवंत भालेराव, तत्कालीन मुख्याध्यापिका दमयंती कमलाकर कुलकर्णी या तिघां विरोधात फिर्याद नोंदवली होती. 

संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी जोरदार आंदोलनही करण्यात आले होते. त्यानुसार भा.द.वि. कलम 295(अ),34 अन्वये गु. र. नं आय 80/2008 दि. ०२ मार्च २००८ कोतवाली पुलिस स्टेशन, अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजीव भोर यांनी वादग्रस्त देखाव्याचा फोटो, वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे देऊन,तसेच तपासात अनेक प्रथितयश इतिहास संशोधकांचे लिखीत म्हणने, सरकारचा पुरातत्व विभाग, बालभारती, भांडारकर संस्था, आदींचे छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी याबाबत लेखी म्हणणे पुराव्यादाखल सादर केले होते. 

दासनवमी निमित्त रामदासांच्या अनुयायांनी त्यांचे वस्तुनिष्ठ, वास्तव चरित्र जरूर दाखवावे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासाच्या पाया पडताना दाखवणे यामागे संबंधितांचा हेतू प्रामाणिक नसून जाणीवपूर्वक असा खोडसाळपणा करण्यात आलेला आहे, अशी भूमिका घेत समर्थ विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत कुलकर्णी, सचिव विश्वेश भालेराव व मुख्याध्यापिका दमयंती कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे समाजविघातक कृत्य विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतले आहे व तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावून राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे असे फिर्यादी भोर यांची तक्रार होती. 

शिवाजी महाराजांबाबत जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे समाजविघातक कृत्य विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतले आहे व तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावून राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे असे फिर्यादी भोर यांची तक्रार होती.. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासाच्या पाया पडताना दाखविल्यामुळे अवमान झाल्याचा असा गुन्हा पहिल्यांदाच दाखल झाल्याने याबाबत प्रचंड चर्चा व वाद विवाद त्यावेळी झडले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यात तीनही आरोपींनी अटकपूर्व जामीन घेऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. त्यावेळी सुनावणी होऊन गुन्ह्याच्या तपासात पुढील आदेश होईपर्यंत मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती. 

सदर महत्वपूर्ण प्रलंबित खटल्यांची सुनावणी दिनांक 16 जुलै 2018 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मा. न्यायाधीश टी व्ही नलावडे व मा. न्यायाधीश के एल वडणे यांच्यासमोर झाली. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी लक्ष्मीकांत कुलकर्णी हे काही वर्षांपूर्वी मयत झाल्याने उर्वरित दोन आरोपी विश्वेश भालेराव व सो दमयंती कुलकर्णी यांचेवतीने ज्येष्ठ विधिज्ञ विजय दीक्षित यांनी बाजू मांडली. फिर्यादी संजीव भोर यांचे वतीने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव साळुके, अॅड. मयुर सालुंके यांनी युक्तिवाद केला. भोर यांचे वतीने बाजू मांडताना अॅड वसंतराव साळुके यांनी रामदास  छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेबाबत किंवा त्यांची भेट झाली असलेबाबत कुठलेही ठोस पुरावे नाहीत, ऐतिहासिक प्रसंगाबाबत शाळा-महाविद्यालयांमधून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये इतिहास कालीन वस्तुनिष्ठ पुरावे, तत्कालीन संदर्भ नसलेले काल्पनिक प्रसंग दाखवून विद्यार्थ्यांना एकांगी विचार देणे, तसेच समाजात, विविध जाती-धर्मियांत तेढ निर्माण करणे हे समाजविघातक व सामाजिक शांततेस बाधा आणणारे कृत्ये आहे, आरोपींनी सदर कृत्य केले असल्याबाबत स्पष्ट पुरावे फिर्यादीने सादर केलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांना कायदेशीर चपराक आवश्यक आहे असा जोरदार युक्तिवाद केला. 

 छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची भेट झाल्याचे किंवा रामदास शिवरायांचे गुरु असल्याचे कुठलेही वस्तुनिष्ठ पुरावे नाहीत हे विविध कागदपत्रांसह त्यांनी न्यायालयासमोर जोरकसपणे सादर केला. मा. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. अशा पद्धतीच्या संवेदनशील विषयाबाबत शालेय विद्यार्थ्यांकडून वादग्रस्त देखावा सादर करणे योग्य आहे का असा प्रश्न मा. न्यायालयाने उपस्थित करून, तसेच शिक्षण संस्था व शाळा महाविद्यालयांशी संबंधित व्यक्तींनी आपल्या विचारधारा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर लादणे योग्य नाही अशी टिप्पणी करीत सदर गुन्हा रद्द करण्याची आरोपींची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे पोलिसांना सदर गुन्ह्याचा पुढील तपास पूर्ण करून दोन आरोपींवर आरोपत्र दाखल करावे लागणार आहे. औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड वसंतराव साळुके, अॅड. मयुर सालुंके यांनी या संवेदनशील, महत्त्वपूर्ण खटल्यामध्ये अभ्यासपूर्वक गांभीर्याने बाजू मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल संजीव भोर यांनी तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने  साळुके यांचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले आहे. 

महामानवांच्या नावाचा वापर करीत, इतिहासाची सोयीस्कर मोडतोड करून व आपापल्या विचारधारा लादून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार समाजात नित्याने पहावयास मिळत आहे. ब्राह्मणवादी असेल किंवा तथाकथित परिवर्तनवादी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महामानवांबाबत अवास्तव, चुकीच्या बाबी पसरवण्याचा प्रयत्न केल्यास यापुढेही अशाच पद्धतीने संघर्ष केला जाईल. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील व जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगळे पाटील यांनी व्यक्त केली.


असा न्यायाधीश पुन्हा होणे नाही

रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. असे जर कुणी आज जाहीर बोलले तर त्याला धमकीचे फोन येतील, त्याला खूप विरोध होईल. हे आजचे वर्तमान आहे. गत वर्षी मा शरद पवार बालगंधर्व मंदिरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना म्हणाले होते की, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे कधीही गुरू नव्हते. यानंतर याविषयी मा शरद पवार यांच्या विरुद्ध पुण्यात प्रस्थापितांनी टीकेची झोड उठविली. मा शरद पवार यांची ही स्थिती तर आपल्यासारख्या सामान्यांची काय गती ? तात्पर्य हे आजमितीला रामदासाविषयी कोणी वक्रदृष्टीने लिहू शकत नाही, बोलू शकत नाही. मग 60 वर्षांपूर्वी जर असे कुणी साहस केले असेल तर त्याची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना केलेलीच बरी.

   1968 साली विदर्भातील इतिहासकार मा म् देशमुख यांनी त्यांच्या शिवचरित्रात रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते तर रामदास हे औरंगजेब बादशहाचे गुप्तहेर होते. देशमुखांनी असा गौप्यस्फोट करून पुण्यातील सनातनी ब्राम्हवृंदाच्या शेपटीवर पाय दिला. साऱ्या ब्राम्हवृंदानी देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली. होय, आचार्य अत्रे यांनी मा म् देशमुखांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढली. ब्राम्हवृंदानी मुंबईच्या कोर्टात रामदासांच्या बदनामी विरुद्ध दावा दाखल केला.     संपूर्ण जनमत देशमुखांच्या विरोधी होते, वातावरण तापलेले होते. न्यायाधीशने स्वतःच्या जीवाची पर्वा  न करता अखेर न्याय दिला.  देशमुख यांचे म्हणणे  न्यायाधीशने मान्य केले. न्यायाधीशाचे त्या काळातील ते साहस आजही अंगावर शहारे उभे करणारे आहे. त्या निर्भीड न्यायाधीशाचे नाव होते, पी बी सावंत. जेधे जवळकर लिखित देशाचे दुष्मन या प्रकरणाची आठवण करून देणारा हा प्रसंग !

            -  भिवा कांबळे, पुणेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com