Top Post Ad

बड्या खाजगी उद्योगांच्या कचाट्यात शिक्षण धोरण

ठाणे
 सगळा देश लॉकडाउनच्या काळात घरात बंदिस्त असताना, संसदेचे काम बंद असताना संसदेत चर्चा न करता घिसाडघाईने आदेश काढून पास केलेलं हे शिक्षण धोरण मुळातच लोकशाहीच्या संकेताविरुद्ध लागू केले गेले आहे. संविधानानुसार शिक्षण हा विषय केंद्र व राज्य सामायिक आहे. परंतु यापुढे ही तरतूद रद्द करून शिक्षणाच्या केंद्रीकरणाचा संविधान विरोधी घाट घातला जाणार असल्याचे स्पष्ट मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी मांडले. 

 समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिकेच्या उदघाटनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समता विचार प्रसारक संस्था गेली १० वर्षे सातत्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ३० जानेवारी या महात्मा गांधी पुण्यतिथी पर्यंतच्या काळात महिनाभर ठाण्यातील विविध लोकवस्तीत सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिका आयोजित करत आहे. या वर्षीही कोरोनाच्या सावटाची गडद छाया बाजूला सारत या व्याख्यानमालिकेची तरुणाईच्या आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात खुल्या व्यासपीठावर दणक्यात सुरवात झाली.    

आपल्या विचारमंथनात ते पुढे म्हणाले,  नव्या धोरणात नमूद केल्या प्रमाणे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा, ऑनलाइन अभ्यासाचा वापर हा या सरकारच्या खाजगीकरणाला उत्तेजन देण्याच्या व्यापक धोरणाचाच एक भाग आहे. मोठ्या उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नफेखोरीच्या प्रवृत्तीने शिक्षण सामान्य माणसांच्या कुवतीबाहेर जाईल. त्यामुळे शिक्षणात आधीच पुढे असलेला समाज त्यांना सहज उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांमुळे आणखीन पुढे जाईल आणि मुळातच आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला, वंचित समाज या सोयी सुविधा घेण्याची ऐपत नसल्याने व शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे राखीव जागा निरर्थक ठरणार असल्याने शिक्षणातून बाजुला पडेल आणि अजूनच मागे जाईल, अशी सार्थ भीती वाटते. या मुळे विषमतेला खतपाणी घालणार्‍या या नविन शिक्षण धोरणाला सर्व बाजूने विरोध होतो आहे. या विरूद्ध येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचे आयोजले आहे. त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

नविन शिक्षण धोरण अनेक अंगाने अडचणीचे 
         कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सतीश प्रधान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे  आपले विचार मांडताना म्हणाले,  बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणातही परिवर्तनाची गरज होती म्हणून १९७५ नंतर बर्‍याच मोठ्या काळानंतर आलेल्या नवीन शिक्षण धोरणा कडून खूप अपेक्षा होत्या. पण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण संस्थांच्या दृष्टीने विचार केला तर या धोरणात प्रस्तावित केलेले बदल कसे अमलात आणायचे या बद्दल कोणतीही स्पष्टता या धोरणात दिसत नाही. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणी विषयी विशेषतः ११ वी, १२ वी च्या वर्गाबाबत गोंधळाचे वातावरण आहे,

 प्राचार्य मराठे पुढे म्हणाले की, मोठ्या महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षकांबाबत काय धोरण असेल या बाबत संदिग्धता आहे.  तसेच तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सोयी सवलती या धोरणात स्पष्टपणे दिसून येत नाहीत. अशा रीतीने हे नविन शिक्षण धोरण अनेक अंगाने सर्वांसाठी अडचणीचे आहे. 

बड्या खाजगी उद्योगांच्या कचाट्यात शिक्षण धोरण
            या वेळी बोलताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, सगळा देश लॉकडाउन च्या काळात घरात बंदिस्त असताना, संसदेचे काम बंद असताना संसदेत चर्चा न करता घिसाडघाईने आदेश काढून पास केलेलं हे शिक्षण धोरण मुळातच लोकशाहीच्या संकेताविरुद्ध लागू केले गेले आहे. संविधानानुसार शिक्षण हा विषय केंद्र व राज्य सामायिक आहे. परंतु यापुढे ही तरतूद रद्द करून शिक्षणाच्या केंद्रीकरणाचा संविधान विरोधी घाट घातला जाणार आहे याकडे त्यांना सर्वांची लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले, नव्या धोरणात नमूद केल्या प्रमाणे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा, ऑनलाइन अभ्यासाचा वापर हा या सरकारच्या खाजगीकरणाला उत्तेजन देण्याच्या व्यापक धोरणाचाच एक भाग आहे. मोठ्या उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नफेखोरीच्या प्रवृत्तीने शिक्षण सामान्य माणसांच्या कुवतीबाहेर जाईल. त्यामुळे शिक्षणात आधीच पुढे असलेला समाज त्यांना सहज उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांमुळे आणखीन पुढे जाईल आणि मुळातच आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला, वंचित समाज या सोयी सुविधा घेण्याची ऐपत नसल्याने व शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे राखीव जागा निरर्थक ठरणार असल्याने शिक्षणातून बाजुला पडेल आणि अजूनच मागे जाईल, अशी सार्थ भीती वाटते. या मुळे विषमतेला खतपाणी घालणार्‍या या नविन शिक्षण धोरणाला सर्व बाजूने विरोध होतो आहे. या विरूद्ध येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचे आयोजले आहे. त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

नव्या शिक्षण धोरणामुळे बाल मजुरी वाढण्याचा धोका
या कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर म्हणाल्या की संविधानाने शिक्षण हे मूलभूत हक्कात गणले आहे त्यामुळे सर्व समाज घटकांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे, आणि त्यासाठी शालेय शिक्षणाचा सर्व खर्च उचलणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. पण या सरकारने गावा गावातील, खेड्या पाड्यातील लहान शाळा कमी विद्यार्थी संख्येमुळे बंद करून तालुका पातळीवर खाजगी उद्योगांच्या परोपकार निधीच्या सहाय्याने मोठी शिक्षण संकुले उभारण्याचे या धोरणात नमूद केले आहे. लहान गावातील, आदिवासी पाड्यातील मुले विशेषतः मुली दूरच्या शाळेत पाठवण्यास पालक कचरतील आणि या मुलांची शाळा बंद होऊन मुले शिक्षणाला पारखी होतील अशी भीती वाटते. तसेच ६ वी ते ८ वी या बाल वयात कौशल्यावर आधारीत व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केल्याने खेड्यातील मुले ८ वी नंतर शाळा सोडून बाल मजुरीकडे वळतील अशी दाट शक्यता वाटते. या बद्दल सर्व सामान्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी आभार प्रदर्शन करताना म्हटले की या सरकारच्या जाती धर्मातील भेदभावाला, विषमतेला उत्तेजन देण्याचा उद्देश या धोरणातही दिसून येतो.  परिवर्तन गरजेचे असले तरीही ते समता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांना धरून असले पाहिजे. ते या नविन शिक्षण धोरणात दिसत नाही.

या कार्यक्रमाला इस्लाम चे अभ्यासक प्राचार्य हुसैन मणियार, मकसुद खान, कोळीवाडा संवर्धन समिती चे डॉ. गिरीश साळगावकर,  इंटक चे सचिन शिंदे, वृषाली कुलकर्णी, जाग चे मिलिंद गायकवाड, शिवाजी पवार, उमाकांत पावसकर,  शैलेश मोहिले आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेची सह - सचिव अनुजा लोहार आणि प्रास्ताविक एकलव्य कार्यकर्ती दुर्गा माळी हिने केले. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मराठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. गेल्या वर्षभरात लॉकडाउन काळात झूम वर आभासी भेटण्याला कंटाळलेल्या महाविद्यालतीन युवांनी आणि एकलव्यांनी आज बाहेर मोकळ्या वातावरणात आयोजित होत असलेल्या या व्याख्यानमालिकेच्या उदघाटनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.

या व्याख्यान मालिकेतील पुढचे व्याख्यान येत्या रविवारी १० जानेवारी रोजी जयहिंद सोसायटी, खारटण रोड येथे सं. ४ वाजता होणार असून त्यात मुख्य वक्ता डॉ. संजय मंगला गोपाळ असणार आहेत, असे संस्थेच्या उपाध्यक्ष लतिका सु. मो. यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, ओंकार जंगम, आतेश शिंदे आदि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com