२६ जानेवारी : राजपथावर ट्रॅक्टर परेड. १ लाख ट्रॅक्टरचा सहभाग

कृषी बील हटावकरिता सुरु असलेल्या आंदोलनाकर्त्या शेतकऱ्यांची  केंद्र सरकार सोबत आठव्या फेरीची बैठक शुक्रवारी झाली. मात्र कृषि बील हटाव या आपल्या मागणीवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघालेला नाही. ही बैठकदेखील निष्फळ ठरली. आता पुढील बैठक 15 जानेवारीला होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्य व अन्नमंत्री पियुष गोयल, वाणिज्य राज्यमंत्री आणि पंजाबचे खासदार सोम प्रकाश यांनी सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसह विज्ञान भवन येथे चर्चा केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत पुन्हा एकदा सरकारने शेतकरी नेत्यांसमोर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरकारकडून असे म्हटले होते, की हा कायदा मागे घेता येणार नाही, कारण बरेच शेतकरी त्यास अनुकूल आहेत. तर कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी नेते वारंवार करत राहिले. सरकारच्या या वृत्तीने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बैठकीच्या मध्येच लंगर खाण्यास नकार दिला. सरकारने दुपारच्या जेवणाला ब्रेक देण्याची विनंती केली. तेव्हा शेतकरी नेते म्हणाले की जेवण किंवा चहा घेणार नाहीत.

मोदी सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करणं आणि एमएसपीची कायदेशीर तरतूद या दोन मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. गेल्या 38 दिवसांपासून शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु आहे.. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर तरतूद करावी यासाठी शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु आहे. आत्तापर्यंत झालेल्या चर्चेच्या फेर्‍यांमधून कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधले शेतकरी 38 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

केंद्र सरकारविरोधात शेतकर्‍यांनी आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 26 जानेवारीच्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीत ट्रॅक्टर परेड करु. राजधानी दिल्लीतील मुख्य परेडनंतर किसान परेड होईल, असं शेतकरी नेते दर्शनपाल सिंग आणि अभिमन्यू कोहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्हाला शांततापूर्ण मार्गाने तोडगा हवा आहे. मोदी सरकारच्या आश्‍वासनांवर आम्हाला विश्‍वास नाही, असेही शेतकरी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले.

गाझीपूर सीमेवर कश्मीरसिंग नावाच्या 75 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली.  मुलगा व नातवासोबत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. त्रस्त होऊन शनिवारी त्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या शौचालयात जाऊन फाशी घेतली. याआधी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सीमेवर 55 वर्षांचे शेतकरी गलतानसिंग यांचा थंडीमुळे मृत्यू झाला होता.


 राकेश टिकैत म्हणाले, ‘आता २६ जानेवारीला राजपथवर परेड करू. आगामी काळात १ लाख ट्रॅक्टर दिल्लीत प्रवेश करतील.’ अन्य नेते म्हणाले, २२-२३ जानेवारीपर्यंत दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांची संख्या दुप्पट होईल. दुसरीकडे, सरकारने चर्चेतूनच मार्ग निघू शकेल, असे आवाहन केले. यानंतर १५ जानेवारीला पुन्हा बैठक होत आहे.

पुढील बैठक १५ रोजी, मात्र शेतकऱ्यांचे लक्ष्य २६ जानेवारी
११ जानेवारी : शेतकऱ्यांचा संयुक्त मोर्चा पुढील योजना तयार करेल. याच दिवशी २६ जानेवारीच्या तयारीची घोषणा.
१३ जानेवारी : लोहडीला देशभर ‘किसान संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. तिन्ही कायद्यांच्या प्रती जाळल्या जातील.
१८ जानेवारी : ‘महिला किसान दिवस’ साजरा करणार. प्रत्येक गावातून १० महिला दिल्ली सीमेवर.
२३ जानेवारी : सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ आझाद हिंद किसान दिवस साजरा करून राज्यपाल निवासाला घेराव.
२६ जानेवारी : राजपथावर ट्रॅक्टर परेड. यात १ लाख ट्रॅक्टर असतील असा दावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या