Top Post Ad

राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता त्याचे काय झाले

राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी आणि अनेक क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती. ४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपतर्फे राम मंदिर निर्मितीकरिता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे.  राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टबरोबरच भाजप व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून हा पैसा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला.

 भाजप व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही. या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत, त्या चिंताजनक आहेत. श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीच्या मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरिता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लूट होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये म्हणून भाजप-आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही याची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली. यासंदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावंत यांनी आपले मत मांडले.

राम मंदिर निर्मितीसाठी देशातील सामान्य व्यक्तीलाही सहभागी होता यावं हा आमचा उद्देश आहे. राम मंदिरासाठी किती खर्च लागेल यासाठी न्यासाने अद्याप काहीही अंदाज सांगितलेला नाही. मात्र माझ्या अंदाजानुसार मुख्य राम मंदिरासाठी 300 ते 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर बाहेरील 70 एकर जागेवरील विकासासह हा खर्च 1100 कोटींच्या घरात जाईल. येत्या तीन ते साडेतीन वर्षात राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि राम भक्तांना ते दर्शनासाठी खुलं होईल, असा विश्वास  राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.  राम मंदिराच्या निर्मितीच्या निधी संकलनाला आता सुरुवात झाली आहे. जनतेच्या सहभागातून राम मंदिर उभारण्याचा राम मंदिर न्यायासा मानस आहे.  कॉर्पोरेटद्वारे असा निधी उभा करणे आम्हाला सहज शक्य होतं.   येत्या तीन-साडेतीन वर्षात राम मंदिर पूर्ण होईल असंही  गिरी महाराज यांनी सांगितलं. राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरु केला त्याळेळी आम्ही 4 लाख गावं आणि 11 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा विचार केला होता. मात्र आता आम्ही सहा लाख गावं आणि 15 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा आम्हाला विश्वास आहे. कारण हे काम करण्यासाठी आता आम्हाला विश्व हिंदू परिषदेकडून मदत मिळणार आहे. त्यांच्या कामावर आमचं लक्षही आहे, असंही गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.

भाजपचा खासदार गौतम गंभीरने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिर उभारणीसाठी वर्गणी अभियानाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून झाली त्यांनी पाच लाखांचा चेक ट्रस्टकडे सोपवला.  राष्ट्रपतींच्या नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी मोठ मोठ्या देणग्या दिल्या आहेत.


थोडक्यात हिशोब -

अयोध्येतील राम मंदीर बांधण्यासाठीचा अंदाजे अपेक्षित खर्च (मंदीर बांधकाम अधिक आजूबाजूचा परिसर सुशोभिकरण वगैरे सर्व खर्च धरुन - राम मंदीर न्यास अयोध्या यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार) रु. १,१०० कोटी. 

भाजपच्या एकूण सदस्यांची संख्या १८ कोटी. (पक्षाने जाहीर केलेला अधिकृत आकडा).

प्रती भाजप सदस्य रु.६१ पैसे ११ एवढे जमा केले तरी भव्य मंदीर निर्माण होऊ शकत. तरी यात  भाजप धार्जिणे मोठे उद्योगपती यांच्या मार्फेत मिळणारी देणगी विचारात घेतलेली नाही. 

आता तरिही जर तुमच्या दरवाजावर हे देणगी मागण्यास येत असतील तर याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की रामाचं नाव घेऊन मतं मागणार्या आणि निवडणुका जिंकणार्या या लोकांची फक्त प्रत्येकी ६१ रुपये देण्याचीही दानत नाही. 

देव धर्म हे प्रत्येकाच्या मानण्या न मानण्यावर आहे. एका मंदीराला देणगी दिली म्हणुन तुम्ही हिंदू होतं नाही आणि नाही दिली म्हणुन तुमचा धर्म भ्रष्ट होतं नाही. हा एखाद्या पक्षाच्या राजकिय अजेंड्याला बळी पडून तुम्ही भोंदू नक्कीच ठरता.

म्हणुन पुन्हा सांगतो, "हिंदू आहात हिंदूच रहा, भोंदू बनू नका".

जय हिंद ! जय श्रीराम !

मंदीर वही बनायेंगे, खर्चा भी हम ही उठायेंगे.


राजेश कदम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com